आनंद डेकाटे, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय व सेवासदन यूपीएससी अकॅडमी यांच्या दरम्यान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेची तयारी करताना आता नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. सामंजस्य करार करताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, सेवासदन संस्थेचे संचालक ॲड. अंधारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर आणि यूपीएससी ॲकडमीच्या वतिने डॉ. कविता जाधव यांनी करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार दोन्ही संस्थांना त्यांच्या कडे उपलब्ध अनुभवी प्राध्यापकांचा उपयोग होईल असे मत प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांनी व्यक्त केले.