व्यापाऱ्याने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:07 AM2021-07-17T04:07:32+5:302021-07-17T04:07:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कोरोनामुळे कामधंदा ठप्प झाल्याने आर्थिक कोंडीचा सामना करत असतानाच घरात वाद वाढल्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनामुळे कामधंदा ठप्प झाल्याने आर्थिक कोंडीचा सामना करत असतानाच घरात वाद वाढल्यामुळे एका तरुण व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. रोहित क्रिष्णराव वऱ्हाडे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वऱ्हाडे गोळीबार चाैकाजवळच्या कोसरकर मोहल्ल्यात राहत होता. तो सीताबर्डीत कपड्याचे दुकान लावायचा. कोरोनामुळे कामधंदा बसल्याने त्याची आर्थिक कोंडी झाली होती. तशात घरात बायकोसोबत त्याचे खटके उडायला लागले होते. त्यामुळे त्याची बायको एक महिन्यापासून वेगळी राहत होती. परिणामी वऱ्हाडेची मानसिक स्थिती बिघडली. त्याने गुरुवारी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. बेबीबाई क्रिष्णराव वऱ्हाडे (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
यापूर्वीही केला होता प्रयत्न
वऱ्हाडेने यापूर्वीही दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस तपासात तसे उघड झाले आहे.