कस्तूरचंद पार्कच्या देखभालीसाठी मेट्रोचा निधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:58 PM2018-02-14T23:58:57+5:302018-02-14T23:59:58+5:30
कस्तूरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल्वे स्टेशनला देताना मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने कस्तूरचंद पार्कची देखभाल दुरु स्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, देखभाल करण्यास मेट्रो रेल्वे कापोर्रेशनने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे यासाठी लागणारा निधी मेट्रो रेल्वेने द्यावा व ही जबाबदारी महापालिकेने सांभाळावी. असा निर्णय बुधवारी महापालिका कार्यालयात आयोजित नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कस्तूरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल्वे स्टेशनला देताना मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने कस्तूरचंद पार्कची देखभाल दुरु स्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, देखभाल करण्यास मेट्रो रेल्वे कापोर्रेशनने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे यासाठी लागणारा निधी मेट्रो रेल्वेने द्यावा व ही जबाबदारी महापालिकेने सांभाळावी. असा निर्णय बुधवारी महापालिका कार्यालयात आयोजित नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
समितीचे सदस्य तथा नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. शुभा जोहरी, नगररचना विभागाच्या नागपूर शाखेच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, वास्तुविशारद अशोक मोखा उपस्थित होते.
समितीच्या बैठकीत नऊ विषयावर चर्चा झाली. २० आॅगस्ट रोजी सद्भावना दिवसानिमित्त आयोजित क रण्यात येणाºया सद्भावना दौडला समितीने मंजुरी दिली. तसेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम आयोजित करण्यालाही सशर्त परवानगी दिली.
स्वच्छतादूत विनोद दहेकार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील अस्वच्छता आणि पार्किंगचा विषय मांडला. आयुक्त कार्यालय अर्थात जुने सचिवालय ही इमारत पुरातन वास्तू असून ती बघण्यासाठी अनेक पर्यटक तेथे येतात.या इमारतीच्या परिसरात नादुरुस्त वाहने आणि इतर शासकीय वाहने उभी असल्याने इमारत विद्रूप दिसते. इतकेच नव्हे तर रात्री असामाजिक तत्त्व इमारत परिसरात मद्य प्राशन करीत असल्याचे त्यांनी समितीच्या लक्षात आणून दिले. या संदर्भात समितीने गंभीर दखल घेत रात्रीच्या वेळी इमारत परिसरात असामाजिक तत्त्वांना प्रवेश बंदी करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
पोलीस लाईन टाकळी, तेलंखेडी येथील क्रीडांगणाकरिता अनुदानित जागेच्या वापरात बदल करून शैक्षणिक संकुलासाठी वापर करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. विषय मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जनार्दन भानुसे, मेट्रोच्यावतीने माणिक पाटील, राजीव यलकावार, अन्य विषयांसाठी विनोद दहेकार, संजय दुधे आदी उपस्थित होते.