नागपुरात  ८० च्या वेगात धावली मेट्रो रेल्वे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:54 PM2019-11-27T22:54:09+5:302019-11-27T23:02:27+5:30

महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली.

Metro train runs at the speed of 80 in Nagpur! |  नागपुरात  ८० च्या वेगात धावली मेट्रो रेल्वे! 

 नागपुरात  ८० च्या वेगात धावली मेट्रो रेल्वे! 

Next
ठळक मुद्देदर १५ मिनिटात फेरी : अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना जॉय राईड करण्यात आली. रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज येथून निघाल्यानंतर काही वेळ वेग कमी होता, नंतर वेग वाढून ट्रॅकवर वेगात धावली.
अजनी मेट्रो स्टेशन ते रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनपर्यंत वळण मार्ग असल्यामुळे वेग कमी झाला होता. पण वर्धा रोडवर पोहोचल्यानंतर जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनपर्यंत रेल्वेचा वेग सरासरी प्रति तास ६५ ते ७० होता. या प्रकारे सीताबर्डी ते जयप्रकाशनगरपर्यंतचा प्रवास केवळ ११ ते १२ मिनिटात पूर्ण केला. प्रवासानंतर पत्रकारांनी जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन आणि सुविधांची पाहणी केली.
मेट्रो हाऊसमध्ये पत्रपरिषदेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. रेल्वे प्रति तास ८० च्या वेगाने धावत आहे. याकरिता अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टमचा अवलंब केला आहे. यामुळे काही जागा वगळता उर्वरित ठिकाणांवर सिंग्नल लावावे लागले नाहीत. सेक्शनमध्ये रेल्वेला थांबविण्याची गरज नाही. अपघाताची शक्यता नाही.
या प्रसंगी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, डीजीएम (सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.

आठवड्यात सरासरी चार हजार प्रवासी
मार्च २०१९ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत मेट्रो रेल्वेत प्रवासाचा लोकांचा कल वाढत आहे. दीक्षित म्हणाले, शनिवार आणि रविवारला १२ हजार आणि आठवड्यात सरासरी दररोज चार हजार लोक प्रवास करीत आहेत. हा आकडा भविष्यात वाढणार आहे.

फीडर बससेवा १३ मार्गावर निश्चित
मेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना ने-आण करण्यासाठी फीडर बससेवेचे १३ मार्ग ठरले आहेत. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनकरिता फीडर बससेवा म्हाळगीनगर ते हिंगणापर्यंतच्या मार्गावर चालविण्याचा प्रस्ताव आहे. याप्रकारे मेट्रो स्टेशनलगतच्या भागासाठी ई-रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सरकार बदलण्याचा प्रकल्पावर परिणाम नाही
दीक्षित म्हणाले, लोकशाहीत निवडणुका होतात. सरकार बदलतात. अशास्थितीत महाराष्ट्रात सरकार बदलण्याचा प्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही. हिंगणा-सीताबर्डी मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.

Web Title: Metro train runs at the speed of 80 in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.