अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:51 PM2018-09-12T22:51:24+5:302018-09-12T22:52:55+5:30
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
प्रवीण सूर्यभान गुबे (५०) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०१६ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ६ वर्षे वयाची होती. आरोपी व मुलगी एकाच वस्तीत रहात होते. त्यामुळे ते एकमेकांना चांगले ओळखत होते. आरोपीने त्याचा फायदा घेतला. दुपारी ४ च्या सुमारास आरोपीने मुलीला स्वत:च्या मोटरसायकलवर बसवून निर्जन ठिकाणी नेले व तेथे मुलीवर अत्याचार केला. हिंगणा पोलीस ठाण्यात त्याची तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. खडके यांनी प्रकरणाचा तपास केला. पोलीस हवालदार अनिल रघटाटे व अशोक जनबंधू यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिजे. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. आसावरी पळसोदकर यांनी बाजू मांडली.