जात पडताळणीचे अर्ज गहाळ

By admin | Published: November 1, 2015 03:26 AM2015-11-01T03:26:07+5:302015-11-01T03:26:07+5:30

अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा तगादा लावला आहे.

Missing caste verification application | जात पडताळणीचे अर्ज गहाळ

जात पडताळणीचे अर्ज गहाळ

Next

अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयातील प्रकार : अर्जदारांची ओरड
नागपूर : अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठीचे अर्ज अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयाकडे येत आहे. मात्र कार्यालयातून अनेकांचे अर्ज गहाळ झाल्याचा आरोप आदिवासी गोवारी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष कैलास राऊत यांनी केला आहे.
अनुसूचित जमातीला जात पडताळणी प्रमाणपत्र अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयातून मिळते. मोठ्या प्रमाणात गैर आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या शासकीय नोकऱ्या लाटल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शासनाने अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा तगाला लावला आहे. नुकत्याच नागपूर दौऱ्यावर आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने विविध विभागातील जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. अनेक कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी कार्यालयाकडे अर्ज दाखल केले आहे. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे अर्ज दोन-दोन वर्षांपासूनचे कार्यालयात पडले आहे.
विभागातर्फे अर्जाची शहानिशा करून आलेल्या प्रकरणाचा निपटारा त्वरित लावणे गरजेचे होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कार्यालयात अर्जाच्या फायलीचा गठ्ठा वाढतच गेला.
आता जेव्हा कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज भासते आहे, तेव्हा कार्यालयात फाईलच सापडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जदारांना प्रमाणपत्रासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहे. यासंदर्भात विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, कुठलेही अर्ज गहाळ झालेले नाहीत. ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांचा अर्ज कुठल्यातरी फाईलमध्ये आहेत. एक दोन दिवसात ते शोधून अर्जावर रीतसर कारवाई होईल असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Missing caste verification application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.