शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
3
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
4
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
5
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
6
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
7
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
8
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
9
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
10
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
11
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
12
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
14
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
15
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
16
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
17
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
18
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
19
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
20
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

जात पडताळणीचे अर्ज गहाळ

By admin | Published: November 01, 2015 3:26 AM

अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा तगादा लावला आहे.

अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयातील प्रकार : अर्जदारांची ओरडनागपूर : अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठीचे अर्ज अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयाकडे येत आहे. मात्र कार्यालयातून अनेकांचे अर्ज गहाळ झाल्याचा आरोप आदिवासी गोवारी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष कैलास राऊत यांनी केला आहे. अनुसूचित जमातीला जात पडताळणी प्रमाणपत्र अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयातून मिळते. मोठ्या प्रमाणात गैर आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या शासकीय नोकऱ्या लाटल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शासनाने अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा तगाला लावला आहे. नुकत्याच नागपूर दौऱ्यावर आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने विविध विभागातील जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. अनेक कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी कार्यालयाकडे अर्ज दाखल केले आहे. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे अर्ज दोन-दोन वर्षांपासूनचे कार्यालयात पडले आहे.विभागातर्फे अर्जाची शहानिशा करून आलेल्या प्रकरणाचा निपटारा त्वरित लावणे गरजेचे होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कार्यालयात अर्जाच्या फायलीचा गठ्ठा वाढतच गेला. आता जेव्हा कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज भासते आहे, तेव्हा कार्यालयात फाईलच सापडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जदारांना प्रमाणपत्रासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहे. यासंदर्भात विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, कुठलेही अर्ज गहाळ झालेले नाहीत. ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांचा अर्ज कुठल्यातरी फाईलमध्ये आहेत. एक दोन दिवसात ते शोधून अर्जावर रीतसर कारवाई होईल असे सांगितले. (प्रतिनिधी)