लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच देता येऊ शकतो, असा दावा प्रसिद्ध कवी व राजकीय विश्लेषक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे व्यक्त केला.जनमंचतर्फे शनिवारी शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित ‘नव्या पर्यायाच्या शोधात-२०१९ ’या जनसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमंचचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश इटनकर होते. जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.प्रा. ज्ञानेश वाकुडकर म्हणाले, देवेगौडा, व्ही.पी. सिंग किंवा मनमोहन सिंह हे पंतप्रधान होतील, असा विचारही कुणी केला होता का? त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. पर्यायांची कमतरता नाही. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र देशातील या पाच मोठ्या राज्यांमध्ये एकूण २०८ लोकसभेच्या जागा आहेत. यापैकी १९२ जागा या भाजपाकडे आहेत. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. ही बाब भाजपा व आरएसएसचे अनेक नेतेही खासगीत मान्य करतात. यापैकी अर्ध्या जागाही कमी झाल्या तरी भाजपाला रोखणे कठीण नाही, असे गणितही त्यांनी यावेळी मांडले.भाजपासारखे विकृत सरकार पुन्हा या देशात येऊ नये. बँका बुडाल्या, शेतकरी मोडला, शाळा बंद पडताहेत, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप बंद झाल्या आहेत. दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी सारेच त्रस्त आहेत. नोटाबंदी ही या देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. देशद्रोहासारखा तो गुन्हा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.प्रकाश इटनकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर प्रा. शरद पाटील यांनी भूमिका विषद केली. संचालन सुहास खांडेकर यांनी केले.प्रामाणिकपणे काम करणारे राजकारणात यावेराजकारणात चांगली प्रामाणिक माणसं येणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शहरात राहणाऱ्या मुलांनी पुढे येण्याची गरज आहे. समाजात अनेक चांगली प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहेत. विद्यार्थी, तरुण, शेतकरी, कवी, प्राध्यापक, पत्रकार, विचारवंत, उद्योजक यांच्यामधूनही नवीन पर्याय पुढे येऊ शकतात. या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचेही प्रा. वाकुडकर म्हणाले.
मोदी नावाचा फुगा फुटला : ज्ञानेश वाकुडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:16 PM
नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच देता येऊ शकतो, असा दावा प्रसिद्ध कवी व राजकीय विश्लेषक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे व्यक्त केला.
ठळक मुद्देनव्या पर्यायाच्या शोधात-२०१९