लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात घसरते शेती उत्पन्न, महाभयानक महागाई, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आर्थिक विषमता, राष्ट्रीय संपत्तीची भाजपा समर्थक उद्योगपतींकडून लूट आणि सीमेवर मोदी सरकारच्या काळात सगळ्यात जास्त सुपुत्र शहीद झाले असून मोदी पॉलिटिक्सने देशाचे वाटोळे केले, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विदर्भ निर्माण महामंचाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांनी केला.अॅड. सुरेश माने म्हणाले, मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजपाची आर्थिक स्थिती वाढली आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून सीव्हीसी लेखापरीक्षण अहवालानुसार बँकांतील आर्थिक घोटाळ्यात वाढ झाली आहे. स्वतंत्र विदर्भाबाबत गडकरी, फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करून वैदर्भीय जनतेच्या आशेचा भंग केला आहे. केवळ नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नाही. विदर्भाचा समतोल विकास होणे गरजेचे होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनता मोदी सरकारला नक्कीच धडा शिकवणार आहे, असे माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विदर्भ निर्माण महामंचाचे अॅड राम नेवले, दशरथ मडावी, सुनील चोखारे, अरुण केदार, प्रा. रमेश पिसे उपस्थित होते.
मोदी पॉलिटिक्सने देशाचे वाटोळे केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:36 PM
देशात घसरते शेती उत्पन्न, महाभयानक महागाई, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आर्थिक विषमता, राष्ट्रीय संपत्तीची भाजपा समर्थक उद्योगपतींकडून लूट आणि सीमेवर मोदी सरकारच्या काळात सगळ्यात जास्त सुपुत्र शहीद झाले असून मोदी पॉलिटिक्सने देशाचे वाटोळे केले, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विदर्भ निर्माण महामंचाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांनी केला.
ठळक मुद्देसुरेश माने यांचा आरोप