नागपूर विभागात निम्म्याहून अधिक विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 08:15 PM2018-06-08T20:15:21+5:302018-06-08T21:13:08+5:30
राज्यात नागपूर विभाग शेवटच्या स्थानी असला तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे. विशेष म्हणजे यात २७ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात नागपूर विभाग शेवटच्या स्थानी असला तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे. विशेष म्हणजे यात २७ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतील आहेत.
विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात एकूण ७९ हजार २१० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही आकडेवारी ५४.१० टक्के इतकी आहे. यात २६ हजार ९९९ विद्यार्थी हे प्रावण्ीय श्रेणीतील आहेत. तर ५२ हजार २२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीतील आहेत. मागील वर्षी २१,७६३ विद्यार्थी प्रावीण्य तर ५०,६३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले होते.
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार २६३ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीत १७ हजार ९१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांची श्रेणीनिहाय आकडेवारी
जिल्हा प्रावीण्य श्रेणी प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी
भंडारा २,७२८ ६,१४० ६,२३७
चंद्रपूर ३,८९० १०,०५४ १०,६३१
नागपूर १२,२६३ १७,९१८ १८,०९२
वर्धा २,८२९ ५,२४० ५,५३९
गडचिरोली १,४०८ ५,०७९ ६,०७१
गोंदिया ३,८२७ ७,७८० ६,९६३
एकूण २६,९९९ ५२,२२१ ५३,५३३
९० टक्क्यांहून अधिक गुण कुणाला?
आश्चर्याची बाब म्हणजे थोड्याथोडक्या नव्हे तर ३ हजार ६८८ विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही टक्केवारी २.४३ टक्के इतकी आहे. तर १२ टक्के विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांहून कमी गुण प्राप्त झाले आहेत.
टक्केनिहाय विद्यार्थी
निकालातील टक्केवारी विद्यार्थी एकूण टक्का
९० टक्क्यांहून अधिक ३,६८८ २.४३
८५-९० ५,२४१ ३.४६
८०-८५ ७,६०१ ५.०१
७५-८० १०,५०६ ६.९३
७०-७५ १३,६६० ९.०१
६५-७० १६,९५९ ११.१९
६०-६५ २१,८२२ १४.४०
४५-६० ५३,९०३ ३५.५६