शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
2
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
3
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
4
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
5
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
6
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
7
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
8
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
9
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
10
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
11
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
12
मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना
13
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
14
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
15
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
16
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
17
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
18
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
19
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
20
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक

कारच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; नागपूर-जबलपूर महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 8:53 PM

Nagpur News अनियंत्रित भरधाव कारचालकाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या दुचाकीस्वार मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागपूर-जबलपूर महामार्गावरील लिहीगाव शिवारात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

 

लाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अनियंत्रित भरधाव कारचालकाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या दुचाकीस्वार मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागपूर-जबलपूर महामार्गावरील लिहीगाव शिवारात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मनिषा गाेपाल खुरपडी (३९) व अनिकेत गाेपाल खुरपडी (२२) दाेन्ही रा. गादा, ता. कामठी, अशी मृत मायलेकाची नावे आहेत.

मृत अनिकेत हा आपल्या आईसाेबत एमएच-४०/बीएम-३९१४ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने उमरेड तालुक्यातील वडद येथून लिहीगावमार्गे गादा गावी परत येत हाेते. दरम्यान, लिहीगाव शिवारात मागून येणाऱ्या एमएच-४९/बीके-१७११ क्रमांकाच्या अनियंत्रित भरधाव कारने त्यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीला जाेरात धडक दिली. ही धडक इतकी जाेरदार हाेती की, दुचाकी अक्षरश: राेडच्या कडेला फेकली गेली व कारच्या समाेरील भागाचा चुराडा झाला. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने अनिकेत व त्याची आई मनिषा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर आराेपी कारचालक तेथून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक श्याम वारंगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दाेघाचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी आराेपी कारचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४, सहकलम १८४, १३४ अ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात