नागपूर विद्यापीठ वसतिगृहातील विलगीकरण कक्ष स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:13 PM2020-07-21T22:13:06+5:302020-07-21T22:18:18+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशास्थितीत तेथील विलगीकरण कक्ष त्वरित स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम तसेच विधिसभा सदस्यांनी केली आहे.

Move the quarantine centre in Nagpur University hostel | नागपूर विद्यापीठ वसतिगृहातील विलगीकरण कक्ष स्थलांतरित करा

नागपूर विद्यापीठ वसतिगृहातील विलगीकरण कक्ष स्थलांतरित करा

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी कुलसचिव, विधिसभा सदस्यांची मागणीगरीब विद्यार्थ्यांना ‘लॅपटॉप’, ‘स्मार्टफोन्स’ पुरवावे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशास्थितीत तेथील विलगीकरण कक्ष त्वरित स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम तसेच विधिसभा सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
१ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थी परत आल्यानंतर ते कुठे राहतील, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे विलगीकरण केंद्र स्थलांतरित करून परिसराचे निर्जंतुकीकरण झाले पाहिजे. तसेच वसतिगृहात सील करून ठेवण्यात आलेली विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे विद्यार्थ्यांना तात्काळ सुपूर्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.
कुणीही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थी साहाय्यता निधी, विद्यार्थी कल्याण निधी व आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत करण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप, स्मार्टफोनसह इतर सोयीसुविधा तात्काळ पुरविण्यात याव्या. यासाठी नियमावली तयार करण्यात यावी. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात संविधान प्रास्ताविका पार्कचे बांधकाम ‘लॉकडाऊन’मुळे थांबले होते. त्या बांधकामाची प्रक्रिया एका आठवड्यात सुरू करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.
शिष्टमंडळात डॉ. ओमप्रकाश चिमणकर, डॉ. केशव मेंढे, प्रा. प्रशांत डेकाटे, स्नेहल वाघमारे, डॉ. नीरज बोधी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Move the quarantine centre in Nagpur University hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.