लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या आंदोलनाला पोलिसांनी उधळून लावल्यानंतरही आंदोलकर्त्यांचा निर्धार कायम राहिला व त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत कूच केले. हे आंदोलन उद्या बुधवारी सकाळी १० वा. पुन्हा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
क्रांतीदिनानिमित्त विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात शहीद चौकात ठिय्या आंदोलन मंगळवारी सकाळी करण्यात आले. यावेळी विदर्भाच्या विविध भागातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनाला प्रारंभ झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेणे सुरू केले. यावेळी तेथे गोंधळाची स्थिाती निर्माण झाली होती. सुमारे ५० आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर या आंदोलकांनी पुन्हा प्रचंड घोषणाबाजी करीत शहीद चौकाकडे कूच केले.उद्या बुधवारी सकाळी पुन्हा १० वाजता आंदोलनाला सुरूवात होईल असे सांगण्यात आले आहे.