नागपुरातील वाठोड्यात तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:36 AM2019-01-16T00:36:23+5:302019-01-16T00:37:06+5:30

जलाराम नगर वाठोडा परिसरात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारस एका तरुणाची चौघांनी निर्घृण हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.

The murder of the youth in Nagpur's Wathoda | नागपुरातील वाठोड्यात तरुणाची हत्या

नागपुरातील वाठोड्यात तरुणाची हत्या

Next
ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून वाद : चाकुने वार, दगडानेही ठेचले : आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जलाराम नगर वाठोडा परिसरात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारस एका तरुणाची चौघांनी निर्घृण हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता. मृतकाचे नाव राहूल शंकर खुबाळकर (वय २४) असून तो जलारामनगरात राहत होता.
राहुलचा भाऊ अमित आणि त्याचा मित्र विशाल गजभिये सोमवारी रात्री दुचाकीने जात होते. त्यांच्या दुचाकीची शूभम नामक टाटा एस वाहनासोबत धडक झाली. यावेळी विशालने जखमी अमित तसेच टाटा एसच्या वाहनचालकाला तेथून जाण्यास सांगून आपण सर्व बघून घेऊ असे म्हटले. त्यानंतर विशाला आज शूभमकडे आला. त्याने जखमी अतिमच्या उपचार आणि दुचाकीच्या दुरूस्तीसाठी ४५ हजारांचा खर्च आल्याचे सांगून ती रक्कम मागितली. शूभमने रक्कम देण्यास नकार दिला आणि त्याने अमितचा भाऊ राहूलची भेट घेतली. आरोपी विशाल आपल्याकडे आला होता, त्याने अमितच्या उपचारासाठी ४५ हजार रुपये खर्च झाल्याचे सांगून तो ती रक्कम मागत असल्याचे म्हटले. अमितच्या उपचारासाठी ११५० रुपये खर्च आल्यामुळे ही रक्कम ऐकून राहुलला धक्का बसला. विशाल दुस-याकडून पैसे हडपण्याचे प्रयत्न करीत असल्याचे लक्षात आल्याने त्याने विशालला बोलवून झापले. तू शूभमला पैसे मागायचे नाही, असेही सुनावले. त्यामुळे आरोपी विशाल चिडला. त्याने नितीन ठाकूर तसेच चायनिज टपरीवाल्या दोघांसोबत संगणमत करून राहुलच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपींनी राहुलवर चाकूचा हल्ला चढवला. त्यानंतर त्याला दगडाने ठेचून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवनचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांना आरोपी सापडले नव्हते. त्यांचा शोध घेतला जात होता.
पत्नीच्या हत्येचा प्रयत्न
जरीपटक्यातील गुरूनानक फार्म सी कॉलेजजवळ, राहणारा आरोपी घनशाम हरीराम गुहीरे, (वय ५०) याने त्याची पत्नी
लक्ष्मी गुहीरे (वय ४५) हिला अनैतिक संबंधाच्या संशयावर ठार मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास आरोपीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी
तव्याने फटके मारून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनदिप घनशाम गुहिरे (वय १९) याने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवुन आरोपीस अटक केली.

 

Web Title: The murder of the youth in Nagpur's Wathoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.