मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना

By admin | Published: December 10, 2015 03:06 AM2015-12-10T03:06:40+5:302015-12-10T03:06:40+5:30

मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भ्रूणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे,

'My Virgo Bhagyashree' scheme for the overall development of girls | मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना

मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना

Next

पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा : पहिल्या वर्षासाठी १५३.२३ कोटी खर्च अपेक्षित
नागपूर : मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भ्रूणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी राज्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबविली जाणार आहे. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता पहिल्या वर्षासाठी १५३.२३ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून १८ वर्षापर्यत ३१११.१८ रुपये एवढा खर्च करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन करतांना सांगितले.
निवेदनामध्ये माहिती देतांना पंकजा मुंडे यांनी सांगितले, माझी कन्या भाग्यश्री ही योजना राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये ज्या मातेने एकुलत्या एक मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थी मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये, मुलगी ५ वर्षे वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी ५ वर्षाकरिता १० हजार रुपये, मुलीच्या ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणा दरम्यान पोषण आहार व इतर खचार्साठी ७ वर्षाकरिता एकूण २१ हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे. ज्या मातेला एक मुलगी असून दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे, अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्याकरिता २ हजार ५०० रुपये, दोन्ही मुली ५ वर्ष वयाच्या होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी ५ वर्षासाठी १० हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरिता ५ वर्षासाठी १५ हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरिता ७ वर्षासाठी २२ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. मात्र एक मुलगी व एक मुलगा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींसाठी विमा योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत २१ हजार २०० रुपयाचा विमा एल.आय.सी. मध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे. यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपयाच्या विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये अशी
४पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन केले असल्यास आजी आजोबांनाही म्हणजे मुलीच्या मातेच्या सासू सासऱ्यांना ५ हजार रुपये पर्यंत सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र देण्यात येईल.
४ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त असेल अशा प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला ५ लाखाचे पारितोषिक देण्यात येईल.
४मुलीच्या पालकांचाही विमा काढण्यात येणार आहे. पालकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये विमाच्या लाभ मिळणार आहे.

Web Title: 'My Virgo Bhagyashree' scheme for the overall development of girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.