तर घरोघरी जाऊन दाढी व केस कापतील नाभिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 02:03 AM2020-05-16T02:03:12+5:302020-05-16T02:07:12+5:30
लॉकडाऊनमधून अनेक क्षेत्राला सूट दिली आहे. त्यांना आपला व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सलून व्यावसायिकांना त्यांचे सलून सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे नाभिक समाजामध्ये असंतोष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमधून अनेक क्षेत्राला सूट दिली आहे. त्यांना आपला व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सलून व्यावसायिकांना त्यांचे सलून सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे नाभिक समाजामध्ये असंतोष आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सुधीर ऊर्फ बंडू राऊत यांनी नाभिक समाजाची व्यथा सामोर मांडली आहे. राऊत यांचे म्हणणे आहे की नाभिक समाजाने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले आहे. मात्र आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जर त्यांना सलून उघडण्याची परवानगी दिली नाही तर समाजाचे लोक घरोघरी जाऊन दाढी व केस कापतील. सरकारने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. सोबतच पंक्चर बनविणारे व जोडे चप्पल शिवणाऱ्यांनाही परवानगी दिली आहे. मात्र आमच्या व्यवसायावर अन्याय केला आहे. सलूनला परवानगी द्यावी, अशी मागणी करताना राऊत यांनी सल्ला सुद्धा प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यास एक दिवस मालक व एक दिवस नोकर काम करेल. सरकारने जर १७ मे नंतर सलून व्यवसायाला परवानगी न दिल्यास नाभिक व्यावसायिक घरोघरी जाऊन काम करतील.