ठळक मुद्देवीज व पाण्यावरून नगरसेवक आक्रमक
आॅनलाईन लोकमतनागपूर : बुधवारी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी थकबाकीदारांच्या यादीत नाव आल्याने वीज वितरण फ्रेन्चायजी कंपनी एसएनडीएलच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. तर काँग्रेसच्या नगरसेवकाने पाण्यासाठी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.एसएनडीएल कंपनीच्या वीज बिल थकबाकीदारांच्या यादीत असलेल्या भाजपा नगरसेवकांची यादी प्रकाशित करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात छाप्रूनगर येथील एसएनडीएलच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. एसएनडीएल व्यवस्थापनाने या संदर्भात लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाजपा नगरसेवक व त्यांच्या कार्यक र्त्यांनी अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करून कार्यालयातील खुर्च्यांची व सामानाची तसेच कार्यालयाबाहेर ठेवण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.प्रवीण दटके यांच्यासह नगरसेवक बाल्या बोरकर यांनी कार्यकर्त्यांसह एसएनडीएलच्या कार्यालयावर धडक दिली. गेटला धक्का देऊन सर्वजण कार्यालयात घुसले. काही कार्यकर्त्यांनी नारेबाजी करीत कार्यालयातील खुर्च्या व खिडक्यांच्या काचांची तोडफोड केली. या गोंधळात एका कर्मचाऱ्याचा मोबाईल फुटला. कंपनीचे महाप्रबंधक स्वप्नेंदू काबी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या संदर्भात सायंकाळी कंपनीतर्फे लकडगंज पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयावर मोर्चा आणून तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र कार्यालयात तोडफोड केली नाही. कार्यकर्त्यांना व नगरसेवकांना शांत करण्याचा प्रयत्न क रीत होतो, असा दावा प्रवीण दटके यांनी केला आहे. एसएनडीएल चालू महिन्याचे वीज बील थकबाकी दर्शवित आहे. या विरोधात आम्ही त्यांच्या कार्यालयावर गेलो होतो. अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिली.तर सदस्यत्व रद्दभाजपाच्या नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे. सामान्य ग्राहकांची बिल थकबाकी असल्यास एसएनडीएल वीज पुरवठा खंडित करते. मात्र नगरसेवकांची नावे थकबाकीदारांच्या यादीत आल्याने तोडफोड के ली जाते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याची कायद्यात तरतूद आहे. महापालिका आता सत्तापक्षाच्या नेत्यांवर कोणती कारवाई करणार असा नागरिकांचा सवाल आहे.पाण्यासाठी कार्यालयाला ठोकले कुलूपप्रभाग २५ मध्ये मागील चार ते पाच महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. तसेच दररोज पाणीपुरवठा होत नाही. टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. असे असूनही पाण्याचे बिल मात्र वसूल केले जाते. यामुळे नागरिकांत नाराजी आहे. नगरसेवक पुरुषोत्तम पुणेकर यांच्या नेतृत्वात बुधवारी नागरिकांनी लकडगंज झोनच्या हिवरीनगर येथील ओसीडब्ल्यू कार्यालयाला कुलूप ठोकले. गजानन मंदिर, महाजनपुरा, विनोबा भावेनगर, गोंडपुरा, उडीयापुरा, कोष्ठीपुरा, सरईपुरा आदी भाागात पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. कंपनीचे झोनल आॅफिसर राजीव रंजन सिंग यांनी नागरिकांची समस्या जाणून त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कुलूप उघडण्यात आले.