नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ग्रामीण भागात ग्रा.पं.च्या मतदानाविषयी युवकात उत्साह दिसून येत आहे. एकूण १३० नियोजित ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (कळमेश्वर) व जटामखोरा (सावनेर) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतीची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतींमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.१२७ ग्रामपंचायतींच्या ४३१ पैकी ४११ वॉर्डात ही निवडणूक होत आहे. येथे ११९६ जागांपैकी १०८६ जागांसाठी मतदान होईल. यासाठी ३०१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप समर्थीत पॅनल अशी लढत होत आहे.
नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.च्या मतदानाला शांततेत सुरुवात, १९% मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:37 AM