राजीव सिंहलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांचा वेग आता मंदावला आहे. वर्तमानात रुग्णांचा डबलिंग रेट ५३.६ दिवसांपर्यंत उतरला असून शहराच्या आरोग्याबाबत हे शुभसंकेत आहेत.ऑगस्टमध्ये संक्रमितांच्या दुपटीचा हा वेग १५ दिवसापर्यंत वाढला होता. सप्टेंबरमध्ये हा वेग उतरत २१ दिवसांवर पोहोचला होता. त्यानंतर डबलिंग रेट फारच मंदावल्याने परिस्थिती सुधारत असल्याचे स्पष्ट होत आहे. एका पंधरवड्यात ही सुधारणा दिसून आली आहे, नागपूरसाठी ही चांगली बाब आहे. जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबरमधील डबलिंग रेट ५३.६ दिवस असल्याचे स्पष्ट केले असून, हळूहळू ही स्थिती सुधारत असल्याचे निदर्शनास येते.सप्टेंबरमध्ये दररोज १७०० ते १८०० रुग्ण संक्रमित आढळत होते. आता हा आकडा दररोज ७०० ते ८०० पर्यंत घसरला आहे. याच कारणाने डबलिंग रेट वाढला आहे. त्याचप्रमाणे संक्रमणाचा दरही घसरून ०.७ वर आला आहे. सप्टेंबरमध्ये हा दर ०.९ इतका होता. एका रुग्णापासून जेवढे नागरिक संक्रमित होतात, त्याला संक्रमण दर म्हटले जाते. नागपुरात सुरुवातीला हा दर ४.५ इतका होता. परंतु, जूनमध्ये हा दर १.१, जुलैमध्ये १.२, ऑगस्टमध्ये २.५ पर्यंत पोहोचला होता. आता मात्र यात सुधारणा होत असल्याचे दिसून येते.नागरिकांच्या सहकार्यानेच झाले शक्य- नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोना संक्रमण कमी करणे अशक्य होते. परंतु, नागरिकांच्या संयम आणि अनुशासनाने संक्रमणाची गती कमकुवत झाली आहे.- संक्रमणाला टोलविण्यात मास्कची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच कारणाने मास्कचा उपयोग अवश्य करावा.- कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी दुसरे सर्वात महत्त्वाचे अस्त्र व्यक्तिश: अंतर आहे. याचे कठोरतेने पालन करा.- सॅनिटायझरचा उपयोग करा. हात साबणाने वारंवार धूत राहा. हे सगळे नियम कठोरतेने पाळल्यास नागपूर लवकरात लवकर संक्रमणापासून मुक्त होईल.