Nagpur Gram Panchayat Election Results : कुही तालुक्यात कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी गड राखला 

By जितेंद्र ढवळे | Published: November 6, 2023 02:31 PM2023-11-06T14:31:37+5:302023-11-06T14:33:21+5:30

भाजपाने दिली जोरदार टक्कर : भिवापुरात ठाकरे गटाने खाते उघडले, स्थानिक आघाड्यांचा धक्का

Nagpur Gram Panchayat Election Results : In Kuhi taluks, Raju Parve of Congress maintained a stronghold | Nagpur Gram Panchayat Election Results : कुही तालुक्यात कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी गड राखला 

Nagpur Gram Panchayat Election Results : कुही तालुक्यात कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी गड राखला 

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपा आणि कॉंग्रेस समर्थित गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांची विजयी घोडदौड सुरु आहे. उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही तालुक्यात २२ ग्रा.पं.च्या निवडणुका झाल्या. या मतदार संघात कॉंग्रेसचे आ. राजू पारवे आणि भाजपाचे आ. सुधीर पारवे यांनी निवडणूक डोक्यावर घेतली होती. कुही तालुक्यात कॉंग्रेसने सुरुवातीच्या निकालात आघाडी घेतली आहे. येथे आकोली ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेस समर्थित गटाच्या मंदा भीमराव पाटील व ७ सदस्य विजयी झाल्या आहेत. 

अंबाडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे योगेश अरुण गोरले व ७ सदस्य विजयी झाले. चिकना ग्रा.पं.च्या सरपंचपदी अपक्ष उमेदवार भगवान लक्ष्मण जुमडे, गोठणगाव ग्रा.प.च्या सरपंचपदी भाजपाचे मुकेश अशोक मारबते, देवळी (खुर्द) ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसच्या रुपाली राजहंस विजयी झाल्या आहेत. अडम ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपा समर्थित गटाच्या शालीनी सेलोकर यांच्याह ९ सदस्य विजयी झाले आहेत. माजरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या मोनाली मोहन हारगुडे, कुचाडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी रश्मी ईश्वर ठाकरे, माळणी ग्रा.पं.च्या सरपंचपदी अपक्ष भास्कर परसराम सहारे, रुयाड ग्रा.पं.सरपंचपदी विजय गोविंदराव गोरबडे, पचखेडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाचे विवेक केवलदास मेश्राम विजयी झाले. 

भिवापूर तालुका 

उमरेड मतदार संघातील भिवापूर तालुक्यात ३४ ग्रा.पं.च्या निवडणुका झाल्या. यात नक्षी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपा समर्थित गटाचे अनिकेत ज्ञानेश्वर वराडे, वडध ग्रा.पं.च्या सरपंचपदी स्थानिक आघाडीचे गुरूदेव काळे, चिखली ग्रा.पं.च्या सरपंचपदी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रणाली सतिष गारघाटे विजयी झाल्या. झिलबोडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसच्या लता भोगे,  मेढा ग्रा.पं.च्या सरपंचपदी सपना संजय मोहड, धामनगाव ग्रा.पं.च्या सरपंचपदी स्थानिक आघाडीच्या वैशाली चौधरी, जवळी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या मेघा मार्गनवार, धापर्ला (डोये) ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या शुंभांगी कुंभरे, उखळी ग्रा.पं. च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे श्रावण मोरे, मालेवाडा ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसच्या राखी चंद्रभान इंगोले, मालेवाडा हे भिवापूर बाजार समितीचे सभापती बाळू इंगोले यांचे मुळ गाव आहे. पाहमी ग्रा.पं.च्या सरपंचपदी स्थानिक आघाडीच्या आरती उमेश भोयर, मांडवा (लभान) ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे सचिन गजभिये, महालगाव ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या अल्का जिवतोडे, नाड (शिवणफळ) ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे नागेश्वर उपरे विजयी झाले. सालेभट्टी (दंदे) ग्रा.पं.च्या सरपंचपदी हंसिनी थेरे (स्वतंत्र पॅनल), भिवी ग्रा.पं.च्या सरपंचपदी  शालु उईके (स्वतंत्र पॅनल), पिरवा ग्रा.पं.च्या सरपंचपदी पोपेश्वर गिरडकर (स्वतंंत्र पॅनल), बोटेझरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे सुनील कुभंरे,  कवडसी (बरड) ग्रा.पं.च्या सरपंचपदी अपक्ष उमेदवार संदीप छापेकर विजयी झाले. 

यांची सरपंचपदी बिनविरोध निवड

  • भिवापूर तालुक्यातील सालभेट्टी (चोर) ग्रा.पं.च्या सरपंचपदी सुनंदा रामकृष्ण इरपाते तर झमकोली ग्रा.पं.च्या सरपंचपदी शारदा रमेश यांची बिनविरोध निवड झाली आहे.  या दोन्ही ग्रा.पं.मध्ये सर्व सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. 
  • कळमेश्वर तालुक्यातील खैरी लखमा ग्रा.पं.च्या सरपंचपदी वर्षा सचिन निंबुळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 
  • मौदा तालुक्यातील आष्टी (नवे) ग्रा.पं.च्या सरपंचपदी सीमा नेवारे यांची निवड झाली आहे. 
  • काटोल तालुक्यातील कातलाबोडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी अर्चना ललित खोब्रागडे तर वाजबोडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी सीमा सुरेश वाहणे यांची निवड झाली आहे. 
  • हिंगणा तालुक्यात मोहगाव (झिल्पी) ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. येथे प्रमोद डाखले सरपंच असतील.

Web Title: Nagpur Gram Panchayat Election Results : In Kuhi taluks, Raju Parve of Congress maintained a stronghold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.