नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनवर प्रति कि.मी.ला २३२ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 07:30 AM2022-05-17T07:30:00+5:302022-05-17T07:30:01+5:30

Nagpur News ७६६ किमी लांबीच्या नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्रति किमी २३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Nagpur-Mumbai bullet train costs Rs 232 crore per km | नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनवर प्रति कि.मी.ला २३२ कोटींचा खर्च

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनवर प्रति कि.मी.ला २३२ कोटींचा खर्च

googlenewsNext
ठळक मुद्दे रेल्वेच्या एसी कोचच्या तुलनेत दीडपट भाडे राहण्याची शक्यताएनएचआरसीएलकडून रेल्वे बोर्डला डीपीआर सादर

आनंद शर्मा

नागपूर : नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचआरसीएल) ने नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर प्रकल्पासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून त्याला मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. आता रेल्वे बोर्ड त्याचे सूक्ष्म अध्ययन करत असून त्यात काही सुधारणेची गरज वाटली तर पुन्हा एनएचआरसीएलकडे पाठविला जाईल.

रेल्वे बोर्डाने या डीपीआरला मंजुरी दिली तर केंद्रीय मंत्री मंडळाचीही मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर अर्थसंकल्पात घोषणा होऊन नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनएचआरसीएलने तयार केलेल्या डीपीआरमध्ये ७६६ किमी लांबीच्या नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्रति किमी २३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्रवासी भाडे अद्याप निश्चित झालेले नसले तरी रेल्वेच्या एसी कोचच्या तुलनेत दीडपट भाडे राहण्याची शक्यता आहे. ही बुलेट ट्रेन नागपूर ते मुंबई दरम्यान १० जिल्ह्यांतून जाईल. वर्धा, खापरी डेपो, पुलगांव, मालेगांव जहांगीर, जालना, कारंजा लाड, मेहकर, शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, ईगतपुरी, शाहपूर ही प्रमुख शहरे जोडली जातील. मुंबई ते नागपूरचा प्रवास फक्त ३.५ तासांत होईल. बुलेट ट्रेनचा कॉरिडोर समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग व अन्य मार्गांना समांतर असेल.

२०१९ मध्ये देशात ६ मार्गांवर हायस्पीट बुलेट ट्रेन प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात नागपूर- मुंबईचाही समावेश होता. या प्रकल्पाची जबाबदारी हायस्पीट रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे सोपविण्यात आली आहे. एनआरएचसीएलने डीपीआर तयार करण्यासाठी मुंबई ते नागपूरपर्यंत हवाई सर्वेक्षण, रायडरशीप सर्वेक्षणासोबतच सामाजिक प्रभावाची तपासणीही केली आहे.

रेल्वे बोर्डाकडून डीपीआरचा अभ्यास सुरू

- ‘नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून आलेल्या माहितीच्या आधारे डीपीआर तयार करण्यात आला आहे. डीपीआर मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला असून बोर्ड त्याचा अभ्यास करत आहे.

- सुषमा गौर, जनसंपर्क अधिकारी, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि., दिल्ली.

Web Title: Nagpur-Mumbai bullet train costs Rs 232 crore per km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.