नागपुरात महापौरांच्या बैठकीत भाजपा नगरसेविकांच्या पतींचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:17 AM2018-04-25T01:17:06+5:302018-04-25T01:17:19+5:30

महापालिके च्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर झोननिहाय नगरसेवकांची मते आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हनुमाननगर झोनमध्ये आयोजित बैठकीत भाजपाच्या नगरसेविका शीतल कामडे यांचे पती प्रशांत कामडे व स्वाती आखतकर यांचे पती चंदू आखतकर यांनी गोंधळ घातला. नगरसेवकांच्या बैठकीत नगरसेविकांच्या पतींनी अधिकाऱ्यांना अपशब्दात बोलून धारेवर धरल्याने काही अधिकारी बैठकीतून निघून गेल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.

Nagpur Municipal Councilors' husband riot up over the Mayor meeting in Nagpur | नागपुरात महापौरांच्या बैठकीत भाजपा नगरसेविकांच्या पतींचा गोंधळ

नागपुरात महापौरांच्या बैठकीत भाजपा नगरसेविकांच्या पतींचा गोंधळ

googlenewsNext
ठळक मुद्देअपशब्दामुळे अधिकारी निघून गेले : पाणीटंचाईवर हनुमाननगर येथे पहिली बैठक : पतींना अनुमती नसतानाही कामकाजात हस्तक्षेप


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिके च्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर झोननिहाय नगरसेवकांची मते आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हनुमाननगर झोनमध्ये आयोजित बैठकीत भाजपाच्या नगरसेविका शीतल कामडे यांचे पती प्रशांत कामडे व स्वाती आखतकर यांचे पती चंदू आखतकर यांनी गोंधळ घातला. नगरसेवकांच्या बैठकीत नगरसेविकांच्या पतींनी अधिकाऱ्यांना अपशब्दात बोलून धारेवर धरल्याने काही अधिकारी बैठकीतून निघून गेल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
प्रभाग ३१ मधील पाण्याचा मुद्दा सभागृहात गाजला होता. नगरसेवक सतीश होले यांनी थेट महापौरांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर दुसºया दिवशी प्रशांत कामडे यांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयात तोडफोड केली होती. पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांनी झोन कार्यालयात नगरसेवक व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रशांत कामडे व चंदू आखतकर उपस्थित होते. त्यांनी गोंधळ घातल्याने निगम सचिव हरीश दुबे बैठकीतून निघून गेले; अन्य अधिकाऱ्यांनीही महापौरांकडे यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्तापक्षाच्या नगरसेविकांचे पतीच बैठकीत गोंधळ घालत असेल तर कामकाज कसे करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बैठकीला जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती श्रद्धा पाठक, झोन सभापती रूपाली ठाकूर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, ओसीडब्ल्यूचे झोनचे अधिकारी उपस्थित होते.
पाणी समस्येबाबत दररोज शेकडो नागरिक नगरसेवकांकडे समस्या मांडत असतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे गेले की त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. समस्यांचे निराकरण केले जात नाही. एकाच प्रभागात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांचा संपूर्ण रोष नगरसेवकांवर असतो, अशा तीव्र भावना नगरसेवकांनी महापौरांपुढे मांडल्या. नगरसेवकांच्या तीव्र भावना लक्षात घेता, महापौरांनी नगरसेवकांनी मांडलेल्या समस्या १५ दिवसांत निकाली काढण्याचे निर्देश दिले.
नगरसेवक अभय गोटेकर, भगवान मेंढे, सतीश होले, रवींद्र भोयर, दीपक चौधरी, नरेश मानकर, संजय बुर्रेवार, मंगला खेकरे, उषा पॅलट, माधुरी ठाकरे, विद्या मडावी, कल्पना कुंभलकर, माधुरी ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Nagpur Municipal Councilors' husband riot up over the Mayor meeting in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.