नागपूर मनपा शाळेचा निकाल ७४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 09:22 PM2018-06-08T21:22:44+5:302018-06-08T21:22:57+5:30
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. महापालिकेच्या शाळांचा निकाल ७४ टक्के इतका लागला आहे. महापौर नंदा जिचकार यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत कौतुक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. महापालिकेच्या शाळांचा निकाल ७४ टक्के इतका लागला आहे. महापौर नंदा जिचकार यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत कौतुक केले.
यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, उपनेत्या वर्षा ठाकरे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, शिक्षण समिती सदस्य स्नेहल बिहारे, राजेंद्र सोनकुसरे, भारती बुंडे, नगरसेविका वंदना भगत, मनीषा कोठे, नगरसेवक किशोर जिचकार, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महापौर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना तुळशीचे रोपटे भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. मागील वर्षीच्या प्रमाणात मनपाच्या शाळेचा निकाल यावर्षी वाढला असल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आणि त्यांच्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
गुणवंत विद्यार्थ्यांमंध्ये मराठी माध्यमातून कु.कोमल गणेश अलोणे, दुर्गानगर माध्यामिक शाळा (९०.६०%), दिव्या मिलिंद नरांजे, दुर्गानगर माध्यामिक शाळा (९०%), भूषण नरेश हर्षे, जयताळा माध्यामिक शाळा (८८.४०%), हिंदी माध्यामातून मनोज राधेश्याम यादव, कपिलनगर माध्यामिक शाळा (९१.२०%), कीर्ती बिरपाल वर्मा, संजयनगर शाळा (९०.६०%), बिसमणी महेश धुर्वे, विवेकानंदनगर शाळा (८८.२०%), उर्दू माध्यामिक शाळेतून समरीन बानो, गरीब नवाज उर्दु (८६%), इकरा शहरीश आबीदखान, एम.के.आझाद (८६%), अलकीया अंजूम अ.रशीद, एम.के.आझाद (८५%), उन्मुलकुश मो.अंसारी, एम.के.आझाद (८५%), मागासवर्गीयातून दुर्गानगर माध्यामिक शाळेचा दिव्या मिलिंद नरांजे याला ९० टक्के प्राप्त झाले. दिव्यांगामधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेचा प्रमोद चौधरी या विद्याथ्यार्ला ७४.८० टक्के प्राप्त झाले आहे. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर यांनी केले. आभार संध्या इंगळे यांनी मानले.