नागपुरातील दुय्यम पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:40 AM2019-02-28T10:40:10+5:302019-02-28T10:42:00+5:30

सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण करण्याच्या प्रकरणी वाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव याच्यावर अखेर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur police inspector filed a rape case | नागपुरातील दुय्यम पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नागपुरातील दुय्यम पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देएक वर्षापासून मुलीवर करीत होता अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण करण्याच्या प्रकरणी वाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव याच्यावर अखेर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव याने सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आल्याने वाडी पोलिसात खळबळ उडाली होती. अटकेच्या भीतीपोटी जाधव वैद्यकीय रजेवर गेले होते व अटकपूर्व जमीनही मिळवीला होता.
प्राप्त माहितीनुसार पीडिता ही नागपूर शहरातील असून पोलीस विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मुलगी होती. पीडिता वाडी पोलीस स्टेशनला ३१ डिसेंबर २०१७ ला एका मुलीच्या मिसिंग बाबत तक्रार करण्यासाठी मैत्रिणीसोबत आली असता प्रशांत जाधव याच्या संपर्कात आली. त्याने या प्रकरणात तिला मदत केली. यानंतर तिचा नंबर घेऊन सारखे फोन करून तू मला भेटायला ये तुझा फोटो पाठव मला झोप येत नाही,आपण कुठेतरी फिरायला जाऊ. माझा संपूर्ण परिवार एका अपघातात संपला असून माझे आता कुणीही नाही. मी तुझ्यासोबत लग्न करतो शासकीय नोकरी लावून देतो अशा प्रकारचे आमिष देत होता. त्याच्या या भूलथापांना तरुणी बळी पडली. जयताळा तसेच शहरातील विविध ठिकाणी त्यांच्या भेटी झाल्या.
त्याने फेब्रुवारी २०१७ ला नोकरी लावून देण्यासाठी बायोडाटाची गरज असल्याचे सांगत तरुणीला डिफेन्स गेट न २ जवळ सायंकाळी बोलाविले. तेथून प्रशांत जाधव याने डिफेन्सस्थित सेक्टर नंबर 1/3/71 क्वॉर्टर न. ६ मध्ये नेऊन रात्रभर पीडितास तेथे थांबवून शारीरिक शोषण केले. यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथे जाधव निघून गेला.
गावावरून परत आल्यावर पीडिता दातांची तपासणी करण्याकरिता लता मंगेशकर येथे आहे अशी माहिती मिळाल्यावर तिला त्याने परत डिफेन्स क्वॉर्टर मध्ये आणून लग्नाचे आमिष देत शोषण केले अशाप्रकारे नित्यनेमाने तो पीडितावर बलात्कार करीत होता. तो पीडिताला गर्भनिरोधकाच्या गोळ्या देत असल्याने शारीरिक संबंध होऊनही गर्भधारणा झाली नाही. कालांतराने दोघात वाद झाला. यानंतर पीडिताला मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थपित करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.
आपली फसवणूक झाली असल्याचे पीडिताच्या लक्षात येताच ती वाडी पोलीस स्टेशनला संबंधित अधिकाऱ्याला भेटायला वारंवार यायची.पण त्याची भेट व्हायची नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी वाडी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. याबाबत पीडिताचे नातेवाईक व पोलिसांची राहुल हॉटेलमध्ये बैठकही झाली होती. परंतु पीडिता तडजोड करायला तयार झाली नाही. आपली तक्रार वाडी पोलीस घेणार नाही म्हणून शेवटी पीडिताने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची लेखी तक्रार पोलीस आयुक्तकडे केली. यानंतर या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोेलीस अधिकाऱ्यांनी केली असता पीडिताने आरोपी संदर्भात दिलेल्या पुराव्यात चौकशीत तथ्य आढल्याने पोलिसांनी तिच्या लेखी तक्रारीनुसार प्रशांत जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nagpur police inspector filed a rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.