नागपूर रेल्वे स्थानक : पीट लाईनवर काम करणाऱ्या रोबोटचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:14 PM2018-12-28T23:14:53+5:302018-12-28T23:15:52+5:30

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पीट लाईनवर काम करणाऱ्या उस्ताद नावाच्या रोबोटची निर्मिती केली असून बैतुल रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत या रोबोटचे प्रदर्शन करण्यात आले.

Nagpur Railway Station: Display of Robot working on Pete Line | नागपूर रेल्वे स्थानक : पीट लाईनवर काम करणाऱ्या रोबोटचे प्रदर्शन

नागपूर रेल्वे स्थानक : पीट लाईनवर काम करणाऱ्या रोबोटचे प्रदर्शन

Next
ठळक मुद्देमहाव्यवस्थापकांकडून पाहणी : तांत्रिक सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पीट लाईनवर काम करणाऱ्या उस्ताद नावाच्या रोबोटची निर्मिती केली असून बैतुल रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत या रोबोटचे प्रदर्शन करण्यात आले.
रेल्वेगाडीची देखभाल पीट लाईनवर करण्यात येते. रेल्वेगाडी पीट लाईनवर आल्यानंतर यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गाडीच्या पार्टची तपासणी करण्यात येते. यांत्रिक विभागाने तयार केलेला रोबोट यात यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करणार आहे. हा रोबोट एचडी कॅमेरा आणि सेंसरयुक्त आहे. यातील कॅमेऱ्यानुसार कोचमधील स्पेअर पार्टचे छायाचित्र, व्हिडीओ चित्रीकरण नियंत्रण कक्षाला मिळते. नियंत्रण कक्षातील अभियंता अँड्राईड अ‍ॅपच्या साह्याने रोबोटला नियंत्रित करू शकतात. मानवी चूक या रोबोटद्वारे दुरुस्त करता येऊ शकते. रोबोटची निर्मिती वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे यांनी केली आहे. बैतुल रेल्वेस्थानकावर महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्यासमोर रोबोटचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंह उप्पल, विभागातील अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Nagpur Railway Station: Display of Robot working on Pete Line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.