राहण्यायोग्य शहारांच्या यादीत नागपूर २५व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:21+5:302021-03-05T04:07:21+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत कामगिरीत सुधारणा - ‘इज ऑफ लीविंग इंडेक्स’ जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या ...
मागील वर्षीच्या तुलनेत कामगिरीत सुधारणा - ‘इज ऑफ लीविंग इंडेक्स’ जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे ‘इज ऑफ लीविंग इंडेक्स’ आज गुरुवारी जाहीर करण्यात आले. यात नागपूरचा क्रमांक २५वा आहे. मागील वेळी नागपूर ३१व्या क्रमाकांवर होते. यावेळी सहा क्रमांकाची झेप घेतली आहे.
राहण्यायोग्य असलेल्या देशातील टॉप शहरांच्या यादीत शिमला व बंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहेत, तर दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या राहण्यायोग्य शहराच्या यादीत इंदूर एक नंबरवर आहे. पहिल्या दहा शहरात महाराष्ट्रातील पिंपरी-चिचवड, पुणे व मुंबई या शहरांचा समावेश आहे, तर नागपूरचा क्रमांक २५वा आहे. मागील वेळी नागपूर ३१व्या क्रमाकांवर होते. यावेळी यात सुधारणा झाली, पण पहिल्या २० शहरांच्या यादीत स्थान मिळालेले नाही.
महापालिका क्षेत्रात महापालिकेने जनतेला कशाप्रकारे मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या याचे आकलन ''इज आफ लीविंग इंडेक्स'' या उपक्रमात केले जाते.
या उपक्रमात देशातील १११ शहरांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामधून नागपुरचे रँकिंग ३१वरून २५ झाले आहे.
तसेच महापालिका कामगिरी निर्देशांक २०२० या उपक्रमातही नागपूर महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी बजावत १११ शहरांमधून ९वा क्रमांक पटकविला आहे.
.....