आॅनलाईन लोकमतनागपूर : माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. यावर्षी नागपूर विभाग व नागपूर जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजनिधीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त अनुप कुमार तसेच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.माजी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील-तेलंगेकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव वल्सानायर सिह, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे आदी उपस्थित होते.यावेळी ध्वजदिन निधीसाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मानधनातून ५१ हजाराचा धनादेश कर्नल सुहास जतकर यांना दिला. तसेच माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ५१ हजार रुपयाचा धनादेश दिला.यावेळी विविध युद्धात, चकमकीत शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा तसेच जखमी झालेल्या जवान, विशेष कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नागपूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी नागपूर जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी १०३ टक्के निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी नागपूर जिल्ह्याला १ कोटी ६४ लाख १६ हजार ५०० रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने १ कोटी ६४ लाख ५० हजार रुपये गोळा करुन उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तसेच पुढील वर्षासाठी १ कोटी ९१ लाख ९८ हजार ४८० रुपयाचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.नागपूर विभागासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी ३ कोटी २७ लाख ७८ हजार ९०० रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी विभागाने ३ कोटी १० लाख ६६ हजार रुपये म्हणजेच ९४.७७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ध्वजदिन निधीसाठी सर्व नागरिकांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
ध्वजदिन निधी संकलनात नागपूर विभागाचे भरघोस योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 7:25 PM
माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. यावर्षी नागपूर विभाग व नागपूर जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजनिधीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त अनुप कुमार तसेच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.
ठळक मुद्दे३ कोटी १० लाख ६६ हजार रुपये संकलितमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव