नागपूर विद्यापीठ : पहिल्या व तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 09:34 PM2019-07-25T21:34:23+5:302019-07-25T21:35:15+5:30
प्रवेशाच्या नावावर विद्यार्थ्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड थांबविण्यासाठी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाने यंदादेखील पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन केंद्रीभूत प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या तीन टप्प्यांची प्रक्रिया सुरू आहे. परंतु विद्यापीठाने पहिल्या व तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक बदलले आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवेशाच्या नावावर विद्यार्थ्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड थांबविण्यासाठी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाने यंदादेखील पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन केंद्रीभूत प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या तीन टप्प्यांची प्रक्रिया सुरू आहे. परंतु विद्यापीठाने पहिल्या व तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक बदलले आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमांमध्ये एलएलएम (मास्टर ऑफ लॉ), एमकॉम (प्रोफेशनल), एमएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), एमसीटी (मास्टर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी), एमएफए (मास्टर ऑफ फाईन आर्टस्), मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. वेळापत्रकानुसार १६ ते १८ जुलै या कालावधीत दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम सादर करायचे होते व १९ ते २३ जुलैदरम्यान महाविद्यालयांत ‘रिपोर्टिंग’ करायचे होते. मात्र नवीन वेळापत्रकानुसार हे ‘रिपोर्टिंग’ गुरुवारपर्यंत करण्यात आले व तिसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा २६ जुलै रोजी जाहीर होतील. अखेरची फेरी २६ जुलैऐवजी ३० जुलै रोजी रोजी गुरू नानक भवन येथे पार पडेल.
दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकातदेखील बदल करण्यात आला आहे. या टप्प्यात ‘एमए’, ‘एमए’ (मास कम्युनिकेशन), ‘एमएसडब्ल्यू’(मास्टर्स ऑफ सोशल वर्क), ‘एमलिब’(मास्टर्स ऑफ लायब्ररी अॅन्ड इन्फॉर्मेशन सायन्स व ‘मास्टर्स ऑफ इंटस्ट्रीयल रिलेशनन्स अॅन्ड पर्सनल मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे. जुन्या वेळापत्रकानुसार २७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. ती आता २९ जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीतील पसंतीक्रम २७ ते २९ जुलैऐवजी २९ ते ३१ जुलै या कालावधीत सादर करता येतील. दुसऱ्या फेरीतील पसंतीक्रम ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्टऐवजी ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत भरता येतील. तर तिसरी व अखेरची असलेली समुपदेशन फेरी १३ ऑगस्टऐवजी १४ ऑगस्ट रोजी गुरू नानक भवन येथे पार पडेल.
पहिल्या टप्प्याचे सुधारित वेळापत्रक
दुसऱ्या फेरीतील रिक्त जागा २६ जुलै
समुपदेशन फेरी ३० जुलै
शैक्षणिक वर्गांना सुरुवात २५ जुलै
महाविद्यालयांत रिपोर्टिंग ३१ जुलै ते २ ऑगस्ट
तिसऱ्या टप्प्याचे सुधारित वेळापत्रक
आक्षेप २५ ते २७ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी २९ जुलै
पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम २९ ते ३१ जुलै
जागांची वाटपयादी १ ऑगस्ट
महाविद्यालयांत रिपोर्टिंंग २ ते ५ ऑगस्ट
पहिल्या यादीतील रिक्त जागा ६ ऑगस्ट
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट
जागांची वाटपयादी ८ ऑगस्ट
महाविद्यालयांत रिपोर्टिंंग ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट
दुसऱ्या फेरीतील रिक्त जागा १२ ऑगस्ट
समुपदेशन फेरी १४ ऑगस्ट
शैक्षणिक वर्गांना सुरुवात १४ ऑगस्ट