लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य होणार नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात येणार असून, १०० इलेक्ट्रिक आणि १०० पेट्रोल अशा २०० कार अधिवेशन काळात वापरण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली. पावसाळी अधिवेशनासाठी प्रशासन सज्ज असून तीन आठवड्यांची तयारी केली आहे. मात्र अधिवेशन चार आठवडे चालल्यास आमची तयारी आहे, असेही अनुप कुमार यांनी स्पष्ट केले.हिवाळी अधिवेशनात बाहेरून गाड्या अधिग्रहित केल्या जातात. पावसाळ्यात पूर परिस्थिती तसेच इतर आपत्कालीन कामांसाठी वाहनांची गरज असल्याने ओला वापरण्यात येणार आहे. याशिवाय भाडे तत्त्वावर सुमारे ४०० गाड्या घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही, इमारतींमध्ये गळती होणार नाही तसेच नाल्या तुंबणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.विधानभवनाच्या प्रवेशद्वारापासूनचा परिसर रेनप्रूफ राहणार आहे. पावसाळी अधिवेशन काळात मोर्चे, धरणे व आंदोलने होण्याची शक्यता कमीच आहे. हे लक्षात घेता बाहेरून अडीच ते तीन हजार पोलीस बोलावण्यात येईल. मुंबईहून तसेच बाहेरून येणाऱ्या कर्मचाºयांची व्यवस्था शहरातील मंगल कार्यालये, वेगवेगळी वसतिगृहे, मानकापूर क्रीडा संकुल आदी ठिकाणी करण्यात आली आहे. याशिवाय हैदराबाद हाऊस येथे पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांसाठी पर्यायी कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले. रामगिरी, देवगिरी, रविभवन, नागभवन येथे पाणी साचणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. संपूर्ण परिसराची साफसफाई व स्वच्छता करण्यात येत आहे.रामगिरी, देवगिरी, रविभवन, नागभवन, आमदार निवास, विधानभवन आणि इतर शासकीय निवासस्थानाच्या देखभाल-दुरुस्तीच्या निविदा काढण्यात आल्या असून, जून अखेरपर्यंत संपूर्ण व्यवस्था करण्यात येईल. बांधकाम विभागाकडून २५ कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. तीन आठवडे अधिवेशन चालणार असल्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या असल्या तरी, प्रशासनाकडून चार आठवड्यांची तयारी करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून अधिवेशन काळात दहा दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे जवळपास सर्वच ठिकाणी वॉटर प्रूफ टेंट तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग, उपायुक्त के.एन.के. राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, आरटी अधिकारी शदर जिचकार उपस्थित होते.वाहन घेणार भाड्यानेपावसाळा लक्षात शासकीय वाहन अधिग्रहित करण्याचे यंदा टाळण्यात आले आहे. त्याऐवजी किरायाने वाहन घेण्यात येतील. त्याचप्रमाणे ओला कंपनीकडून २०० वाहनांचा पुरवठा होणार असून कंपनीशी करार करण्यात आला आहे. १००० ते १२०० रुपये प्रति दिवसप्रमाणे त्यांना पैसे देण्यात येतील. ओला शंभर ग्रीन टॅक्सी, तर शंभर पेट्रोल-डिझेलवरील टॅक्सीचा पुरवठा करणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होते. ग्रीन टॅक्सीमुळे प्रदूषण कमी होणार असल्याचा दावा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केला.मोर्चे कमी, बंदोबस्त कमीपावसाळी अधिवेशनादरम्यान कमी मोर्च निघतील. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत पोलीस बंदोबस्त कमी लागेल, असेही अनुपकुमार यांनी सांगितले.
नागपूर विधिमंडळ परिसर राहणार ‘रेनप्रूफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 11:03 PM
दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य होणार नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात येणार असून, १०० इलेक्ट्रिक आणि १०० पेट्रोल अशा २०० कार अधिवेशन काळात वापरण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली. पावसाळी अधिवेशनासाठी प्रशासन सज्ज असून तीन आठवड्यांची तयारी केली आहे. मात्र अधिवेशन चार आठवडे चालल्यास आमची तयारी आहे, असेही अनुप कुमार यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देपावसाळी अधिवेशन : प्रशासन सज्ज