नागपूर जिल्हा परिषद :अंगणवाडीच्या बांधकाम यादीवरून विरोधकासह अध्यक्षांचेही दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 08:47 PM2019-02-09T20:47:20+5:302019-02-09T20:48:32+5:30

जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाडीचे बांधकाम व अंगणवाडीतील शौचालयाच्या बांधकामासाठी चार कोटींचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला-बाल कल्याण विभागाने पाठविलेले प्रस्ताव हे कुठल्याही सदस्यांना अथवा जि.प. अध्यक्षाला विचारात न घेता जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला परस्पर पाठविल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य शिवकुमार यादव यांनी केला. त्यांच्या विरोधाला दुजारा देत अध्यक्ष निशा सावरकर यांनी महिला व बाल कल्याणच्या सभापतीसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Nagpur Zilla Parishad: The pressure control of the President along with the opposition on the Anganwadi construction list | नागपूर जिल्हा परिषद :अंगणवाडीच्या बांधकाम यादीवरून विरोधकासह अध्यक्षांचेही दबावतंत्र

नागपूर जिल्हा परिषद :अंगणवाडीच्या बांधकाम यादीवरून विरोधकासह अध्यक्षांचेही दबावतंत्र

Next
ठळक मुद्देसभापतीसह अधिकाऱ्याला केले टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्क      
नागपूर : जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाडीचे बांधकाम व अंगणवाडीतील शौचालयाच्या बांधकामासाठी चार कोटींचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला-बाल कल्याण विभागाने पाठविलेले प्रस्ताव हे कुठल्याही सदस्यांना अथवा जि.प. अध्यक्षाला विचारात न घेता जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला परस्पर पाठविल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य शिवकुमार यादव यांनी केला. त्यांच्या विरोधाला दुजारा देत अध्यक्ष निशा सावरकर यांनी महिला व बाल कल्याणच्या सभापतीसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
महिला व बाल कल्याणचा महिला मेळावा रद्द करण्यामागे अध्यक्षांचा हात होता, असा रोष समितीच्या सदस्यांमध्ये होता. बजेटच्या सभेत समितीच्या सदस्यांनी सभागृहात रोषही व्यक्त केला. त्यात समितीच्या सदस्यांनी विरोधक शिवकुमार यादव यांच्यावरही रोष व्यक्त केला. त्यामुळे महिला व बाल कल्याण समितीला कमकुवत दाखविण्यासाठी त्यांनी जिल्हा नियोजनमधून महिला व बाल कल्याण विभागाला मिळालेल्या चार कोटींच्या निधीतून अंगणवाडी बांधकाम व शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी सदस्यांना विचारणा केली नाही, अधिकाऱ्यांनी सभापतीच्या स्वाक्षरीने प्रस्ताव परस्पर जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे पाठविले. या मुद्यावरून शिवकुमार यादव यांनी सभापतीसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यात अध्यक्ष निशा सावरकर यांनीही फोडणी दिली. पंचायत समितीमधून मी यादी आणली आहे. त्यात माझी स्वाक्षरी नाही. पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही अध्यक्ष आणि सीईओंची स्वाक्षरी न घेता परस्पर पाठविल्यामुळे अध्यक्षांनी सभापतीसह अधिकाऱ्यांचा चांगलाच पाणउतारा केला. यादीसुद्धा सभागृहात अध्यक्षांनी झळकविली.
दरम्यान सभापती पुष्पा वाघाडे यांनी दुसऱ्याच दिवशी अंगणवाडी बांधकामाची यादी मागविली. त्यात त्यांचीही स्वाक्षरी नव्हती. सीईओंच्या स्वाक्षरीनुसार फक्त अंगणवाडी बांधकामाचे प्रस्ताव पाठविले होते. अंगणवाडी शौचालय बांधकामाचे प्रस्ताव अजूनही विभागाकडेच असल्याची माहिती त्यांनी दिली.
 टार्गेट करण्याचा प्रयत्न
बजेटच्या बैठकीत अध्यक्षांनी ज्या पद्धतीने विषय समजून न घेता, सत्य परिस्थिती न बघता, विरोधकाच्या हो ला हो लावत आगपाखड केली. हा प्रकार समितीला, समितीच्या सदस्यांना केवळ टार्गेट करण्याचा होता.
पुष्पा वाघाडे, सभापती, महिला व बाल कल्याण समिती

Web Title: Nagpur Zilla Parishad: The pressure control of the President along with the opposition on the Anganwadi construction list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.