शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

नागपूरकर गिरवताहेत संविधानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 11:18 AM

सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने पुढाकार घेत वस्त्यांवस्त्यांमध्ये जाऊन संविधान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत नागरिक आता संविधानाचे धडे गिरवू लागले आहेत.

ठळक मुद्देसामाजिक न्याय विभागाचा पुढाकारवस्त्यांवस्त्यांमध्ये संविधान जनजागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने पुढाकार घेत वस्त्यांवस्त्यांमध्ये जाऊन संविधान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत नागरिक आता संविधानाचे धडे गिरवू लागले आहेत. नागपुरात राबविण्यात येत असलेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग असून राज्यभरात राबविण्यात येणार आहे.भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असल्याची जगात ओळख आहे. समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या तत्त्वावर आधारित हे संविधान देशातील प्रत्येक नागरिकांना सन्मानाने जगण्याचे हक्क प्रदान करतो. परंतु आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या संविधानाबाबतच नागरिकांमध्ये उदासीनता आहे. बहुतांश नागरिकांना संविधानाबाबत फारशी माहिती नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने यासंदर्भात पुढाकार घेत विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत वस्त्यांमध्ये जाऊन संविधानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी प्रतिष्ठानने एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. यासोबतच वरिष्ठ अधिकारी स्वत: वस्त्यांमध्ये जाऊन संविधान काय आहे. त्यात काय सांगितले आहे. यासंदर्भात नागरिकांना इत्थंभूत माहिती देतात. १ सप्टेंबरपासून या अभियानास सुरुवात झाली असून आतापर्यंत १० वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे. यासाठी एक समता रथही तयार करण्यात आला आहे.

वकील, कायदेतज्ज्ञ व अभ्यासकांनीही सहभागी व्हावेएक जागरूक नागरिक घडावा, या उद्देशातून ही मोहीम राबवली जात आहे. वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही लोकांना संविधान समजावून सांगतो. संविधानाची प्रत वितरित करतो. तसेच शासनाच्या विविध योजनांचीही माहिती देतो. सुरुवातीला शहरातील स्लम भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. सकाळी सर्व लोक आपापल्या कामासाठी निघून जातात त्यामुळे सायंकाळची वेळ निश्चित केली आहे. जागरूक नागरिक निर्माण करण्याच्या या मोहिमेत वकील, कायदेतज्ज्ञ आणि संविधान अभ्यासकांनीही सहभागी व्हावे.- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, मुख्य समन्वयक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान तथा प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण

टॅग्स :Governmentसरकार