लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका खासगी कंपनीच्या चार संचालकांनी एचडीएफसी बँकेच्या एका अधिकाऱ्याशी संगनमत करून एका व्यक्तीला ६९ लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीचे हे प्रकरण पोलिसांकडे पोहचल्यानंतर आता मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बंधूनगर, झिंगाबाई टाकळी येथील गणेश गंगाप्रसाद तिवारी (वय ५२) यांनी एचडीडी मशीन खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सदर शाखेकडे कर्ज प्रकरण सादर केले होते. बँकेने त्यांना ५४ लाख ४६ हजारांचे कर्ज मंजूर केले. ही एचडीडी मशीन त्यांना आरोपी सचिन शर्मा (संचालक, जियो ट्रेचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.), मनीषा सचिन शर्मा (संचालक, जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.), राजेश (संचालक, जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.) आणि शिल्पी चव्हाण (संचालक, जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.) यांच्याकडून६९.४६ लाखांत घ्यायचे ठरले होते. त्यासाठी त्यांनी जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.च्या उपरोक्त संचालकांकडे १५ लाख रुपये जमा केले होते. १० सप्टेंबर २०१६ ते ३ जुलै २०१७ या कालावधीत हा व्यवहार झाला होता. उपरोक्त आरोपींनी कर्ज प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून आपल्या खात्यात ५४ लाख ४६ हजार रुपये जमा करून घेतले. आता अनेक महिने होऊनही मशीन मात्र तिवारी यांना दिलीच नाही. जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.च्या उपरोक्त संचालकांनी बँक अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून आपली फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने तिवारी यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशीनंतर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.मेड इन चायना!तिवारी भूमिगत केबल टाकण्याचे काम करतात. आरोपींशी संपर्क आल्यानंतर त्यांनी तिवारींना चायना मेड एचडीडी मशीन मागवून देतो, असे सांगितले होते. मात्र, संपूर्ण रक्कम घेतल्यानंतरही मशीन उपलब्ध करून दिली नाही. दुसरीकडे ही मशीन आली की नाही आली, त्याची कोणतीही शहानिशा न करता बँक अधिकाऱ्यांनी ५४.४६ लाखांची रोकड आरोपींच्या खात्यात वळती केली. मेड इन चायना नावाप्रमाणे मशीनचा सर्व व्यवहार कागदावरच पार पडला.
नागपुरात व्यवसायिकास ६९.४६ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:08 PM
एका खासगी कंपनीच्या चार संचालकांनी एचडीएफसी बँकेच्या एका अधिकाऱ्याशी संगनमत करून एका व्यक्तीला ६९ लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीचे हे प्रकरण पोलिसांकडे पोहचल्यानंतर आता मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देजियो ट्रेंचलेस कंपनीच्या संचालकावर गुन्हा : बँक अधिकारीही अडचणीत