डांबरीकरण नावासाठी; पाऊस येताच पुन्हा खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:40 AM2018-08-21T00:40:40+5:302018-08-21T00:41:26+5:30

पारडी उड्डाणपुलाच्या नियोजनशून्य कामामुळे पारडी चौकाला जोडणाऱ्या सर्व मार्गाची दुरवस्था झालेली आाहे. नागरिकांचा प्रचंड विरोध विचारात घेता पारडी ते कळमना व पारडी चौक ते पारडी बाजार दरम्यानच्या काही भागात पावसाची उघाड असताना डांबरीकरण करण्यात आले. परंतु पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अद्याप जोराचा पाऊ स झाला नसतानाही रविवारी डांबरीकरण करण्यात आलेल्या भागातील गिट्टी निघाली असून, रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.

For the name of tarpaulin; When the rain comes, the pits again | डांबरीकरण नावासाठी; पाऊस येताच पुन्हा खड्डे

डांबरीकरण नावासाठी; पाऊस येताच पुन्हा खड्डे

Next
ठळक मुद्देपारडी उड्डाणपूल : नागरिकांच्या जीवाला धोका


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी उड्डाणपुलाच्या नियोजनशून्य कामामुळे पारडी चौकाला जोडणाऱ्या सर्व मार्गाची दुरवस्था झालेली आाहे. नागरिकांचा प्रचंड विरोध विचारात घेता पारडी ते कळमना व पारडी चौक ते पारडी बाजार दरम्यानच्या काही भागात पावसाची उघाड असताना डांबरीकरण करण्यात आले. परंतु पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अद्याप जोराचा पाऊ स झाला नसतानाही रविवारी डांबरीकरण करण्यात आलेल्या भागातील गिट्टी निघाली असून, रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.
पारडी चौक ते कळमना दरम्यानच्या मार्गावरील एका भागात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आॅफ इंडियाने आधीच खोदकाम केले आहे. येथील खांब उभारण्याचे काम बºयाच दिवसापासून रखडले आहे. मार्गाच्या दुसºया बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा सुरू आहे. पावसाला सुरुवात होताच या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते. ‘लोकमत’ ने यासंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून नागरिकांना होणारा त्रास निदर्शनास आणला; सोबतच प्राधिकरणाची मनमानी व लोकप्रतिनिधींची उदासीनता उघडकीस आणली होती.त्यानंतर औपचारिकता म्हणून खड्डे पडलेल्या भागात डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु निकृष्ट कामामुळे रविवारी सायंकाळी पहिल्याच पावसात मार्गावरील गिट्टी बाहेर आली. डागडुजी करण्यात आलेल्या भागात पुन्हा खड्डे पडले. यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
पारडी चौक ते वर्धमाननगर, प्रजापती चौक ते स्वामीनारायण मंदिर मार्गाचीही अशीच अवस्था आहे. रस्ता कमी व खड्डे अधिक झालेले आहेत. या भागात डांबरीकरण कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकप्रतिनिधी जागे कधी होणार?
पूर्व नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. कृष्णा खोपडे या भागाचे आमदार आहेत. महापालिकेत पूर्व नागपुरातील एकूण नगरसेवकांपैकी ९० टक्के नगरसेवक भाजपाचे आहेत. लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे पारडी भागात वास्तव्यास आहेत. त्यांनाही या खड्ड्याच्या मार्गाने ये-जा करावी लागते. असे असूनही ते गप्प का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या भागातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकाºयांना निवेदन सादर करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.डांबरीकरणाला सुरुवात होताच वाडीभस्मे याचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले होते. परंतु रविवारच्या पावसात रस्ता पुन्हा उखडल्याने ते आता नागरिकांना काय सांगणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील इतर नगरसेवकांनीही मौनीबाबाची भूमिका घेतली आहे.

Web Title: For the name of tarpaulin; When the rain comes, the pits again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.