लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बरखास्त झाल्यानंतर नासुप्रतर्फे नागपूर शहरात राबविण्यात येणारे विकास प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येतील अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु बरखास्तीनंतर नासुप्रतर्फे राबविण्यात येणारे विकास प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणार आहे. यात प्रगतीपथावरील व प्रस्तावित प्रकल्पांचा समावेश आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.नासुप्रतर्फे सध्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा तीर्थस्थळाचा विकास , नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाची उर्वरित कामे, शांतिवन(चिचोली) मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूंचे जतन व संरक्षण करणे, संग्रहालयाचे आधुनिकीकरण व परिसराचे सुशोभीकरण करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे बांधकाम, प्रधानमंत्री आवास योजना (सर्वांना घरे २०२२) या अंतर्गत गरीब लोकांसाठी १० हजार घरांचे बांधकाम करणे, मौजा.चिखली (देव) आणि मौजा पारडी येथे आदिवासी मुलांचे वसतिगृह बांधकाम, मौजा.वाठोडा येथे नासुप्रद्वारे बांधण्यात येणाºया सर्व सामान्य लोकांना परवडणाºया घरकू ल योजना, लकडगंज परिसरात पोलीस स्टेशन व कर्मचाºयांकरिता ३४८ निवासी गाळ्यांचा प्रकल्प, मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा परिसराचे विकास कार्य, मौजा. चिखली(देवस्थान) येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व नागपूर शहरातील १० सिव्हेज ट्रीटमेंट प्लांटच्या कामांचा यात समावेश आहे.शहरातील व महानगर क्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्पात फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे, लाईट व लेझर मल्टीमीडिया शो तसेच अंबाझरी उद्यान येथे स्वामी विवेकानंद यांचे जीवनावर आधारित लाईट, साऊंड व मल्टीमीडिया शो, दीक्षाभूमी स्तुपाचे नूतनीकरण व मजबुतीकरण, बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत दीक्षाभूमी, शांतिवन-चिचोली व ड्रॅगन पॅलेस-येथील विकास कामे, ड्रॅगन पॅलेस पर्यटन स्थळ परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करण तसेच नागपूर ग्रामीण क्षेत्रात वाकी, आदासा, धापेवाडा, पारडसिंगा, नारायणपूर, नागपूर शहरातील ताजबाग, तेलंगखेडी, वर्धा जिल्ह्यात केळझर, गिरड या सर्व ठिकाणी पर्यटन विकास व संत चोखामेळा येथे एक हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम महानगर विकास प्राधिकरणमार्फत केले जाणार असल्याची माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.
नासुप्रचे प्रकल्प विकास प्राधिकरण राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:58 AM
नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बरखास्त झाल्यानंतर नासुप्रतर्फे नागपूर शहरात राबविण्यात येणारे विकास प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येतील अशी शक्यता वर्तविली जात होती.
ठळक मुद्देदीपक म्हैसेकर : प्रगतिपथावरील व प्रस्तावित प्रकल्पांचा समावेश