शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

कर्जाद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची लूट; बँक अधिकाऱ्यांचेही हितसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 10:42 AM

दिवस-रात्र मेहनत करून बँकेत पैसा जमा करणाऱ्या खातेधारकांची रक्कम, बोगस दस्तऐवजाच्या आधारे एका टोळीच्या माध्यमातून कर्ज देऊन लुबाडली जात आहे.

ठळक मुद्देबोगस दस्तऐवजाच्या आधारे वाहनांचे कर्ज वाटप

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवस-रात्र मेहनत करून बँकेत पैसा जमा करणाऱ्या खातेधारकांची रक्कम, बोगस दस्तऐवजाच्या आधारे एका टोळीच्या माध्यमातून कर्ज देऊन लुबाडली जात आहे.  बऱ्याच प्रकरणांत अधिकाऱ्यांचे या टोळीसोबत हितसबंध असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ वर्षांत या टोळीने खासगी बँकेसोबतच अनेक राष्ट्रीयीकृत बँकांची लूट केली आहे. विशेष म्हणजे या टोळीने केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकृत बँकांनासुद्धा चुना लावला आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार २०११ ते २०१६ दरम्यान या टोळीची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या मते अशा चार ते पाच टोळ्या सक्रिय आहेत. या टोळींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांचे वाहन कर्ज मिळविले आहे. बँकांनीसुद्धा कुठलीही चौकशी न करता कर्ज दिले आहे. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांवरसुद्धा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशाच काही घटना आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोळीचे सदस्य वाहन विक्रेता असल्याचे बोगस कागदपत्र तयार करून वाहनाच्या कर्जासाठी बँकेकडे अर्ज करतात. आयकर तसेच अन्य बोगस कागदपत्र जोडून कर्जही मिळवितात. मात्र कर्ज घेऊन बँकेचे कर्ज चुकवीत नाही. काही प्रकरणात अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणात झटपट कर्ज मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना कमिशनसुद्धा देण्यात येते. गुन्हे शाखेने टोळींच्या काही सदस्यांसह अधिकाऱ्यांनासुद्धा अटक केली आहे.

बँकेच्या नवीन शाखेवर नजरया टोळींची नजर ही शहरातील विविध परिसरात सुरू होणाऱ्या बँकेच्या नवीन शाखेवर असते. शाखा नवीन असल्याने त्यांना कर्जाची रक्कम सहज उपलब्ध होते. राष्ट्रीयीकृत बँकांच्या अशा अनेक शाखा आहेत, जिथे टोळीच्या सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी मिळून घोटाळे केले आणि बराच काळ याची माहिती लपवून ठेवली. मुख्यालयातून कर्ज वसुलीचा दबाव आल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेबरोबर शहरातील अनेक पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या.

आताही सुरू आहे लुबाडणूकआर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार २०१६ नंतर प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पहिले बँक अधिकारी प्रकरण दाबतात. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव आल्यानंतर पोलिसात तक्रार करतात. आताही अनेक बँकेत अशा घटना घडत आहेत.

अशी करतात लुबाडणूकगुन्हे शाखेकडून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत समोर आलेल्या प्रकरणात एक समानता आढळली आहे. टोळीचे सदस्य बँकेत स्वत:ला नामांकित कंपनीचा अधिकृत वाहन विक्रेता सांगतात. वाहन कर्जासाठी बँकेत अर्ज करतात. अर्जासोबत कर्जासाठी आवश्यक डीलरशिप, आयकर व अन्य बोगस कागदपत्रं जोडतात. त्यांना विनाचौकशी कर्जाची राशी उपलब्ध होते. कर्ज मिळाल्यानंतर ही टोळी वाहनांची खरेदीही करीत नाही आणि कर्जाचे हप्तेही भरत नाही. काही प्रकरणात असेही आढळले आहे की अधिकाऱ्यांनी मुद्दाम प्रकरणाची तक्रार केली नाही.

खापरखेड्यात समोर आले प्रकरणनुकतीच खापरखेडा येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेत एका टोळीने या पद्धतीचा घोटाळा केल्याची घटना उजेडात आली आहे. टोळीने बँकेतून सहा वेगवेगळ्या नावाने ४५ लाखाचे वाहन कर्ज घेतले. या बँकेने सहा महिन्यानंतर या प्रकरणाची तक्रार दाखल केली. खापरखेडा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यात ताब्यात घेण्यात आलेल्या एका आरोपीने जमानतीसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, परंतु तो परत घेण्यात आला.

२४ तासाच्या आत कर्ज मंजूरखापरखेड्यात समोर आलेल्या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांनी सांगितले की, आरोपीने सहा लोकांच्या नावावर कर्जासाठी अर्ज केले होते. अर्जासोबत बोगस कागदपत्र जोडले होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी न करता २४ तासात कर्ज मंजूर केले. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यानंतर स्पष्ट होईल, की बँकेच्या या घोटाळ्यात अधिकारी गुंतले आहे की नाही.

टॅग्स :bankबँक