आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:38 AM2020-08-08T01:38:58+5:302020-08-08T01:40:29+5:30
योजना कामगारांमध्ये मोडणाऱ्या आशा, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, पाणलोट कर्मचारी आदींच्या देशव्यापी संपाला आजपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : योजना कामगारांमध्ये मोडणाऱ्या आशा, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, पाणलोट कर्मचारी आदींच्या देशव्यापी संपाला आजपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
नागपूरमध्ये आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फ त पंतप्रधान यांना निवेदन सादर केले. आयटकचे राज्य महासचिव श्याम काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय जिल्ह्यात नागपुर (ग्रामीण), हिंगणा, कळमेश्वर, काटोल, नरखेड, सावनेर, पारशिवनी, रामटेक, मौदा, उमरेड, कुही, भिवापूर या तालुका कार्यालयासमोरही धरणे प्रदर्शन करण्यात आले. स्कीम कामगारांना वेळोवेळी केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली अंगणवाड्या बंद करणे थांबविण्यात यावे, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण रद्द करा, रद्द केलेले ४४ कामगार कायदे पुन्हा लागू करा, सर्व क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना कायम करा, एन.एच.एम कर्मचाऱ्यांना सामावून घ्या आदी मागण्या पुढे ठेवण्यात आल्या. पुढे ८ ऑगस्ट रोजी सर्व कामगार काळ्या फिती लावून प्रदर्शन करणार असून ९ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे श्याम काळे यांनी जाहीर केले.