आज घटस्थापना : शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजननागपूर : शहरातील विविध मंदिरे व मंडळांच्यावतीने २५ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरदरम्यान नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी अखंड ज्योत, ध्वजपूजा, दुर्गापाठ, होमहवन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नऊही दिवस रासगरबा व दांडियाच्या रंगांनी शहर उजळून निघणार आहे. पश्चिम नागपूर नागरिक संघ, रामनगरपश्चिम नागपूर नागरिक संघाच्यावतीने रामनगरातील श्रीराम मंदिरात मनोकामना अखंड ज्योत १००१ चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीराम मंदिरात घटस्थापना होणार आहे. त्याच दिवशी रात्री ७.३० वाजता हिंडोल पेंडसे व अनुजा मेंघळ समूह देवी गीते सादर करणार आहे. २६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता निरंजन बोबडे व समूहाचा भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रवीण पाचंगे देवीचा गोंधळ सादर करतील. २८ रोजी सायंकाळी अरुणा भिडे ‘या देवी सर्व भूतेषू’ही नाटिका सादर करतील. २९ रोजी सुरभी महिला मंडळ स्त्री शक्तीचा जागर करतील. ३० रोजी गरबा, १ आॅक्टोबर रोजी पंडित राजेंद्र शर्मा व मास्टर सागर शर्मा माँ भगवती संगीतमय जागरण सादर करतील. २ रोजी होमहवन व कुमारी पूजन, ३ ला सकाळी १० वाजता घट विसर्जन व मनोकामना अखंड ज्योत समापन होईल. सायंकाळी ५ वाजता शस्त्रपूजन व सीमोल्लंघन, श्रीराम पालखी व मिरवणूक निघणार असून, सायंकाळी ६ वाजता रामनगर मैदानात रावण दहन होणार आहे. बेलिशॉप शिवमंदिरश्री शिव मंदिर, द.पू.म. रेल्वे कॉलनी, बेलिशॉप-मोतीबाग येथे सकाळी ८ वाजता घटस्थापना होईल. त्यानंतर आरती व प्रसाद वितरण होईल. दुपारी १२ वाजता मनोकामना अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येईल. दुपारी २ वाजता माता की चौकी होईल. रोज सकाळी ७.३० वाजतापासून आरती, रांगोळी स्पर्धा व जसगायन होईल. २८ रोजी दुपारी ३ वाजता निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा, १ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता सामूहिक आरती, २ रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, ११ वाजता हवन, कन्यापूजन व प्रसाद वितरण होणार आहे. ३ रोजी ११ वाजता घट विसर्जन व दुपारी मनोकामना अखंड ज्योत विसर्जन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता शस्त्रपूजन होईल. श्री महालक्ष्मी मंदिर, जयप्रकाशनगरश्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समितीच्यावतीने उत्सवादरम्यान दररोज सकाळी ६.३० वाजता अभिषेक, आरती व सायंकाळी आरती व प्रसाद वितरण होणार आहे. २५ रोजी सकाळी ६.३० वाजता घटस्थापना, दुपारी ४ वाजता दत्त उपासना व सायंकाळी ७ वाजता उत्सवाचे उद्घाटन होईल. २६ रोजी १२ वाजता ‘श्री सुक्त’, सायंकाळी ७ वाजता कीर्तन, ८ वाजता भजन, २७ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘सुगम संगीत’, २८ला सकाळी १० वाजता अथर्वशीर्ष, सायंकाळी ७ वाजता भजन, २९ला सकाळी १० वाजता रुद्राभिषेक, दुपारी ४ वाजता भजन, सायंकाळी वीणाताई कुळकर्णी यांचे प्रवचन, ३० रोजी सकाळी ९.३० वाजता गोंधळ व सायंकाळी जोगवा होणार आहे. १ आॅक्टेबर रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मी याग व सप्तशती पाठ, रात्री देवीजागर, २ रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मी याग व पूर्णाहूती, सायंकाळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता सुवर्ण वितरण व प्रसाद वितरण होणार आहे. ५ आॅक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर भावसार समाज पंचकमिटीनागपूर भावसार समाज पंचकमिटीतर्फे श्री हिंगुलाबिंका शक्तीपीठाचा नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी व सायंकाळी ८ वाजता महाआरती, विविध स्पर्धा व प्रसाद वितरण होणार आहे.२७ रोजी दुपारी १ वाजता महिला व लहान मुलांच्या विविध स्पर्धा होणार असून सायंकाळी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ रोजी दुपारी २ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिष्यवृत्ती वाटप, होमहवन, महाप्रसाद व गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ रोजी रात्री गरबा, ३० रोजी दुपारी दुर्गासप्तशती पाठ, १ आॅक्टोबर रोजी दुपारी महाप्रसाद, २ रोजी होमहवन, कुमारिकांना भोजन व महाप्रसाद वितरण होईल. ३ रोजी सकाळी अखंड ज्योत महाआरती व घट विसर्जन होईल. माताराणी वैष्णो शक्तिपीठ, शंकरपूरमाताराणी वैष्णो शक्तिपीठ, छोटा कटरा, खापरी नाका, शंकरपूर येथे उद्या, २५ रोजी घटस्थापना होणार आहे. ३ आॅक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज चेतना समिती, नंदनवनसमाज चेतना समितीच्यावतीने नंदनवन कॉलनी येथील चवडेश्वरी देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता सिंधू व अनिल आष्टीकर यांच्या हस्ते अभिषेक व घटस्थापना होणार आहे. सायंकाळी ७ वाजता विद्या व शरद कापसे यांच्या हस्ते आरती होईल. सार्वजनिक खदान दुर्गामाता मंदिरमंदिरात २५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता घटस्थापना, अखंड ज्योत प्रज्वलित होणार आहे. रोज ध्वजपूजन, दुर्गापाठ, महाआरती, जसजागरण, रासगरबा, कन्यापूजन, महायज्ञ व प्रसाद वितरण होणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. माँ भवानी चॅरिटेबल ट्रस्ट, कळमनागुरुवारी सकाळी ९ वाजता गौरीदेवी व राजू शर्मा यांच्या हस्ते मातेचा अभिषेक, शृंगार, आरती व दुपारी २ वाजता घटस्थापना होईल. रोज सकाळी ७ वाजता व सायंकाळी ७.३० वाजता भजन, रामायन, जस डायका होणार आहे. १ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता हवन, २ रोजी रात्री ७ वाजता महाप्रसाद वितरण होईल. ३ रोजी सकाळी १०.३० वाजता घट विसर्जन करण्यात येईल. शनिमंदिर, सीताबर्डीमंदिरात महाकाली मनोकामना अखंड ज्योतचे आयोजन करण्यात आले आहे. २ आॅक्टोबर रोजी अखंड ज्योतचे समापन होणार आहे. उत्सवामध्ये सप्तसती पाठ, भजन, जागरण होणार आहे. १९ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नवदुर्गा उत्सव मंडळ, मानेवाडा रोडनवदुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने माँ दुर्गा मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २५ रोजी सकाळी ७ वाजता घटस्थापना, सायंकाळी जागरण, २६ रोजी देवी गोंधळ, ३० सप्टेंबर रोजी १००८ महिला महाआरती करतील. १ आॅक्टोबर रोजी जस गायिका श्रेया तिवारी यांचे जागरण होईल. २ रोजी कन्यापूजन व महाप्रसाद वितरण करण्यात येईल. गणेश मंदिर, मुकुंदनगरसांस्कृतिक भवन धर्मादाय विश्वस्त संस्थेच्यावतीने गणेश मंदिरात २५ रोजी सकाळी ६ वाजता माँ रेणुकामाता व सती अनसूया माता यांना अभ्यंगस्नान होईल. सकाळी ९ वाजता घटस्थापना करून अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येईल. मंदिरात रोज सकाळी ७ वाजता आरती, अभिषेक, दुपारी भजन, सायंकाळी आरती, गोंधळ व प्रसाद वितरण होणार आहे. २ आॅक्टोबरला नवरात्र उत्थापन होईल. श्री दुर्गा पूजा उत्सव समिती, धंतोलीश्री दुर्गा पूजा उत्सव समितीच्यावतीने दीनानाथ ज्युनिअर कॉलेज व हायस्कूलमध्ये श्री दुर्गा पूजा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते २५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन होणार आहे. साईबाबा सेवा मंडळ, विवेकानंदनगरश्री साईबाबा सेवा मंडळाच्यावतीने श्री साई मंदिर, विवेकानंदनगर, वर्धा रोड येथे २५ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव व साईबाबा पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रोज सकाळी ८ वाजता अभिषेक करण्यात येईल. २५ ला सकाळी ८ वाजता घटस्थापना, अभिषेक, दुपारी ३ वाजता सुगम संगीताचा कार्यक्रम, २६ रोजी सायंकाळी ७ वाजता नामसंकिर्तन, २७ला सायंकाळी भजन, २८ ला दुपारी वेद घोष, सायंकाळी साई स्वरांजली, २९ रोजी साई गीतायण, ३० रोजी भक्तीसंगीत, १ आॅक्टोबर रोजी दुपारी हवन, सायंकाळी भक्तीसंगीत नजराणा व २ आॅक्टोबर रोजी महाप्रसाद वितरण होणार आहे. ३ रोजी सकाळी ६ वाजता श्रीचे मंगलस्नान, दुपारी आरती, भजन व सायंकाळी पालखी निघेल. श्री साई सेवाश्रम, अयोध्यानगरश्री साई सेवाश्रम, साईबाबा मंदिरात २५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवामध्ये १५१ साईभक्त सकाळी ६ ते ९.३० वाजता सामूहिक पारायण करतील. त्यानंतर आरती व प्रसाद वितरण करण्यात येईल.(प्रतिनिधी)संपूर्ण दिवस घटस्थापनेसाठी शुभ : अनिल वैद्य घटस्थापना करण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ आहे. त्यामुळे घटस्थापना करण्यासाठी निश्चित अशी वेळ नाही, असा सल्ला ज्योतिषाचार्य अनिल वैद्य यांनी भाविकांना दिला आहे. संपूर्ण दिवस शुभ असला तरी केवळ दुपारी १. ३० ते ३ वाजेपर्यंतचा काळ हा राहू काळ असल्याने अशुभ आहे. हा काळ वगळून भाविकांनी इतर कुठल्याही वेळात घटस्थापना केली तरी चालेल. याशिवाय गुरुवारचा सकाळी ६. ३० ते ८ वाजेपर्यंतचा काळ सर्वाधिक शुभ आहे. पण या काळात घटस्थापना करता आली नाही तरी इतर वेळी स्थापना करण्यात काहीही अडचण नाही. नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी काही सुतक असले तर दुसऱ्या दिवशीही घटस्थापना करण्यात येते. ज्या दिवशी घट उठवले जातात तोच दिवस पंचांगात महत्त्वाचा सांगितला आहे. त्यामुळे अनेक लोक तीन, पाच आणि एक दिवसाचाही घट मांडतात, असे ज्योतिषाचार्य अनिल वैद्य यांनी सांगितले.
नवरात्रोत्सव आजपासून
By admin | Published: September 25, 2014 1:34 AM