लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टंटबाजी करणाऱ्या युवकांविरुद्ध कठोर कारवाई न करता त्यांना पोलिसांनी सोडले. यातून निर्माण झालेल्या वादामुळे संतप्त नागरिकांच्या गर्दीने जूना कामठी पोलीस ठाण्यात जोरदार गोेंधळ घालत तोडफोड केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. यात अनेकांना मार बसला.पोलीसांनी फिर्यादी कामठी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंजाबराव भानुसे यांच्या तक्रारीवरून कामठी भाजपचे अध्यक्ष विवेग मंगतानी यांच्यासह १५० लोकांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार संतप्त गर्दीने पोलीस ठाण्यात असलेल्या एका वाहनाची तोडफोड केली. कही लोकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये घुसून सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचवले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही फुटेजचे इलेक्ट्रीक बटन बंद केले. सोबतच उपकरणही तोडले आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु तनाव कायम आहे. त्यामुळेच सकाळी गोंधळ घालणाऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अज्ञात स्थळी ठेवले. दुपारनंतर त्यांना कामठी ऐवजी रामटेकच्या न्यायालयात सादर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना २२ नोव्हेंबरपर्यंत न्यायिक तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले आहे.परंतु या प्रकरणााबत अजुनही रहस्य कायम आहे. कारण जुने कामठी पोलीस ठाण्याचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. लोकमतने गुरुवारी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी अशी कुठलीही घटना घडलीच नाही असे सांगितले. या घटनेशी संबंधित व्हीडिओ दाखविले असता त्यांनी घटना घडल्याचे मान्य केले. सोबतच या प्रकरणी कुणाविरुद्धही गुन्हा दाखल केला नाही, असे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठलीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. हे ही समजू शकले नाही की, अखेर कोणत्या गोष्टीवरून इतका वाद निर्माण झाला की, पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली.प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार ुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास स्थानिक भाजप नेते विवेक मंगतानी आपल्या समर्थकांसह व परिसरातील काही नागरिकांसह जुने कामठी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी कांटी ओळी परिसरातील रस्त्यावर स्टंटबाजी करणारे आणि अधिक गतीने वाहन चालवणाऱ्या बाईक चालकांवर कुठलीही कारवाई न करता सोडल्याच्या कारणावरून गोंधळ घातला. थोड्याच वेळात पोलीस ठाण्यात गर्दी वाढत गेली. ते स्टंटबाजी करणाऱ्या युवकांना तातडीने अटक करण्याची मागणी करू लागले.वाढत गेला वादप्रत्यक्षदर्शीनुसार यादरम्यान पोलीस अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला. प्रकरण शांत होण्याऐवजी आणखी वाढत गेले. अतिरिक्त पोलीस बोलावण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारीही पोहोचले. पहाटे ३ वाजता प्रकरण इतके वाढले की, संतप्त लोकांनी पोलीस ठाण्यात तोडफोड सुरु केली. तर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केली.पोलिसांनी नाही केली कुठलीही कारवाईमिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री .३० वाजता कांटी ओळी परिसरात काही युवक भरधाव गतीने बाईक चालवित रस्त्यावर स्टंटबाजी करीत होते. यावरून रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही लोकांसोबत त्यांचा वादही झाला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. नागरिकांचा आरोप आहे की, स्टंटबाजी करणाऱ्या युवकांची टोळी नेहमीच असे करीत असतात. भरधाव वेगाने बाईक टालवून स्टंटबाजी करतात. पोलिसात तक्रार केली जाते परंतु कुठलीही कारवाई होत नाही. बुधवारीही तसेच झाले. युवकांवर कुठलही कारवाई न करताच त्यांना सोडण्यात आले.पोलीस म्हणतात आरोप चुकीचेयाबाबत जुने कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी कारवाई केली होती. युवकांचे वाहन जप्त करण्यात आले होते. त्यांचे वाहन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.आज कामठी बंदचे आवाहनमंगतानी व इतर लोकांना अटक करण्यात आल्याच्या विरुद्ध कामठी भाजपातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौक येथून पोलिसांच्या विरुद्ध रॅली काढण्यात येईल. याबाबत सोशल मिडियावर संदेश व्हायरल करून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.