नागपुरात अडीच हजार विद्यार्थ्यांनी साकारले सुंदर हस्ताक्षर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:25 AM2019-12-22T00:25:34+5:302019-12-22T00:37:43+5:30
रमण विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अक्षरभूषण मधुकर भाकरे प्रतिष्ठानच्या वतीने केंद्राच्या परिसरात ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’उत्साहात पार पडली. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रमण विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अक्षरभूषण मधुकर भाकरे प्रतिष्ठानच्या वतीने केंद्राच्या परिसरात ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’उत्साहात पार पडली. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गेल्या १६ वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जात असून, यावर्षी स्पर्धेला शालेय विद्याार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नागपूर कार्बन प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बन्सल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रमण विज्ञान केंद्राचे शिक्षणाधिकारी विलास चौधरी, विजय जथे, अजय भाकरे, विश्वास महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष वऱ्होकर, राजेश परमार उपस्थित होते. यावेळी ८० शाळेतील अडीच हजार विद्याार्थी सहभागी झाले. त्यात मूकबधिर आणि अपंग शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळी थंडी असताना विविध शाळांतील हजारो विद्याार्थी मोठ्या उत्साहात स्पर्धेत सहभागी झाले होते. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी बन्सल व जथे यांनी विद्याार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासात सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व संचालन अभय भाकरे यांनी केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २५ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. पारितोषिक कार्यक्रमाला महापौर संदीप जोशी, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आमदार नागो गाणार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.