देह व्यापाराच्या तपासात पाेलिसांचा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:19+5:302021-02-10T04:09:19+5:30
नागपूर : अमरावती मार्गावरील फ्लॅटमध्ये देहव्यापाराचा हायप्राेफाइल अड्डा चालविणाऱ्या आराेपींची न्यायालयातून जामिनावर सुटका झाली आहे. पाेलिसांनी न्यायालयीन काेठडीची मागणी ...
नागपूर : अमरावती मार्गावरील फ्लॅटमध्ये देहव्यापाराचा हायप्राेफाइल अड्डा चालविणाऱ्या आराेपींची न्यायालयातून जामिनावर सुटका झाली आहे. पाेलिसांनी न्यायालयीन काेठडीची मागणी केल्यामुळे त्यांची सुटका झाल्याचे बाेलले जात आहे. त्यामुळे अंबाझरी पाेलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे गुन्हे शाखेने साेमवारी भरतनगरच्या पुराणिक ले-आऊटमधील स्वामी अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर धाड टाकून हरियाणाच्या तीन तरुणींची सुटका केली हाेती. पाेलिसांनी हिसार, हरियाणा निवासी कृष्णकुमार देशराज वर्मा (२४) व हैदराबाद निवासी माे. माेबिन माे. ख्वाजा (२३) या आराेपींना अटक केली हाेती. प्राथमिक तपासात दाेघांचेही आंतरराज्यीय देह व्यापाराच्या टाेळी संबंध असल्याची बाब समाेर आली हाेती. पाेलिसांनी त्यांच्याकडून कारसह ५.७५ लाखाचा माल जप्त केला हाेता. आराेपींनी त्या तरुणींना दर महिन्याला एक लाख रुपये कमाई करण्याची लालच देऊन येथे आणले हाेते. गुन्हे शाखेने कारवाई करून तपासाची जबाबदारी अंबाझरी पाेलिसांना साेपविली हाेती.
सूत्राच्या माहितीनुसार पाेलिसांनी आराेपींची झाडाझडती घेऊन सत्य बाहेर आणण्याऐवजी त्यांना न्यायालयीन काेठडीत ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे आराेपींची जमानतीवर सुटका हाेऊ शकली. मिळालेल्या माहितीनुसार आराेपी ऑनलाइन कारभार करीत हाेते. ते शहरातील अनेक चर्चित लाेकांशी जुळले हाेते. अंबाझरी पाेलिसांमध्येही चलती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांचा अड्डा चालत हाेता. म्हणूनच सत्य लपविण्यासाठी अंबाझरी पाेलिसांनी आराेपींना पाेलीस काेठडीत ठेवण्याची मागणी केली नसल्याचा आराेप केला जात आहे. त्यांनी पीडित तरुणींनाही विस्तृत चाैकशी केली नसल्याचे बाेलले जात आहे.