नागभवन ताेडून बनेल नवीन इमारत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:22+5:302021-03-04T04:14:22+5:30
कमल शर्मा नागपूर : राज्यातील राज्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेले नागभवनचे बंगले लवकरच नवीन आधुनिक रूप धारण करणार आहेत. येथे अत्याधुनिक ...
कमल शर्मा
नागपूर : राज्यातील राज्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेले नागभवनचे बंगले लवकरच नवीन आधुनिक रूप धारण करणार आहेत. येथे अत्याधुनिक गेस्ट हाऊससह राज्यमंत्र्यांच्या निवासासाठी सहा माळ्याची इमारत बनविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
नागभवनाच्या आधुनिकीकरणासाठी येथील राज्यमंत्र्यांचे बंगले आणि प्रधान सचिवांचे बंगले ताेडले जाणार आहेत. प्रस्तावानुसार या जागेवर सहा माळ्याची इमारत तयार केली जाणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार कामासाठी ८९६ काेटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी नागभवनाच्या नवीन बांधकामाबाबत सादरीकरण केले.
यानुसार राज्यमंत्र्यांचे काॅटेज, प्रधान सचिव बंगला आणि सर्व्हंट क्वाॅर्टर्स ताेडून सहा माळ्याचे गेस्ट हाऊस तयार केले जाईल. तळमजल्यावर पार्किंग, मेंटेनन्स सेंटर व चौकीदार कक्ष असेल. याशिवाय पाेडियम लेव्हलवर स्वागत-प्रतीक्षा कक्ष, सभागृह, मीटिंग हॉल, प्रसाधनगृह व उपाहारगृह असेल. पहिल्या ते सहाव्या माळ्यापर्यंत आठ-आठ व्हीआयपी कक्ष असतील. यासह पहिल्या माळ्यावर चार कक्ष, दुसऱ्यावर १२, तिसऱ्यावर २०, चाैथ्यावर २८, पाचव्यावर ३६ आणि सहाव्या माळ्यावर ४४ कक्ष तयार करण्यात येतील.
प्रत्येक माळ्याचा खर्च वेगळा
मजला क्षेत्र (वर्गमीटरमध्ये) खर्च (काेटीमध्ये)
तळमजला १८९१.६६ ४०
पोडियम लेव्हल १८९१.६६ ७०
पहिला १८९१.६६ ८६
दुसरा १८९१.६६ १०४
तिसरा १८९१.६६ १२२
चौथा १८९१.६६ १४०
पाचवा १८०१.६६ १५८
सहावा १८९१.६६ १७६
असे आहे नागभवन
एकूण क्षेत्रफळ २८३२८ वर्गमीटर (७ एकर)
एकूण काॅटेज १६, प्रधान सचिव बंगला, सर्व्हंट क्वाॅर्टर
उपलब्ध क्षेत्रफळ २५६७०.३२ वर्गमीटर
उपलब्ध एफएसआय १.२५
एका वर्षात पूर्ण हाेईल बांधकाम
पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता जनार्दन भनुसे यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती दिली. जर निर्धारित वेळी आवश्यक निधी प्राप्त झाला तर एका वर्षात नागभवनचे बांधकाम हाेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.