नागपुरातील विभागीय क्रीडा संकुलाला ‘न्यू लूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:23 PM2018-12-04T22:23:24+5:302018-12-04T22:29:35+5:30

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरासह मुख्य स्टेडियममध्ये आवश्यक सुधारणांसह केलेल्या नूतनीकरणानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणामुळे येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा संकुल नव्या स्वरूपात सज्ज झाले आहे.

'New Look' to the Regional Sports Complex in Nagpur | नागपुरातील विभागीय क्रीडा संकुलाला ‘न्यू लूक’

नागपुरातील विभागीय क्रीडा संकुलाला ‘न्यू लूक’

Next
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळासाठी सुविधा : आकर्षित स्टेडियम, सुशोभित परिसर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरासह मुख्य स्टेडियममध्ये आवश्यक सुधारणांसह केलेल्या नूतनीकरणानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणामुळे येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा संकुल नव्या स्वरूपात सज्ज झाले आहे.
मानकापूर येथे बांधण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी प्रशिक्षणात्मक साहित्य-सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. या विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकाम मागील दशकापूर्वी झाले होते. खेळाडूंना अधिक चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भारतीय रस्ते महासभेच्या अधिवेशनानिमित्ताने विविध विकास कामे पूर्ण केली आहेत. यामध्ये इन्डोअर स्टेडियमच्या नूतनीकरणाचाही समावेश आहे. नूतनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
इन्डोअर स्टेडियमसह परिसरातील विकास कामांमध्ये वृक्षारोपणसह सुशोभिकरण करण्यात आल्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. बाहेरील सर्व मैदानाची दुरुस्ती केल्यामुळे फुटबॉल, सॉफ्टबॉलचा नियमित सराव करणे शक्य झाले आहे. त्यासोबतच खेळाडूंसाठी कायमस्वरूपी प्रसाधनगृह, स्टेडियममध्ये व बाहेरसुद्धा पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असून, मुख्य प्रवेशद्वारावर फोटो गॅलरी तयार करण्यात आली आहे. स्टेडियमला न्यू लूक देताना आकर्षक रंगसंगती व सजावट पूर्ण करण्यात आली आहे. या नूतनीकरणाच्या कामामुळे विभागीय क्रीडा संकुलाच्या सुविधांमध्ये वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा आयोजनासाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
विभागीय क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देशमुख, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपविभागीय अभियंता अनिल देशमुख, चंद्रशेखर गिरी, शंकरापुरे, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सुशोभिकरण व नूतनीकरणाची कामे पूर्ण केली आहेत.
अशी आहे सुविधा

विभागीय क्रीडा संकुल येथे इन्डोअर स्टेडियममध्ये सात हजार प्रेक्षक बसू शकतील अशी सुविधा असून, दहा बॅडमिंटन कोर्ट, जिम्नॅस्टिक, व्यायामशाळा, बॉक्सिंग, टेबलटेनिस आदी सुविधा असून, येथे दोन हजार खेळाडू नियमित लाभ घेतात. क्रीडा संकुलामध्ये एशियन बॅडमिंटन, चॅम्पियनशिप, सिनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात येतात. क्रीडा संकुलातील वातानुकूलित क्षमतेत वाढ करणे, बॅडमिंटन, कास्टिंग नवीन पॅनल बसविणे, खेळाडूंसाठी प्रसाधनगृह तसेच जिम्नॅशियम हॉलच्या नूतनीकरणासाठी महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे या स्टेडियमला नवीन स्वरूप मिळाले आहे.

 

Web Title: 'New Look' to the Regional Sports Complex in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर