विधानसभा निवडणुकीनंतर कचरा संकलनाची नवी यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:51 PM2019-08-27T23:51:12+5:302019-08-27T23:53:06+5:30

शहरातील कचरा संकलन योग्यप्रकारे व्हावे,यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कचरा संकलनाची नवी यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे.

New system of garbage collection after assembly elections | विधानसभा निवडणुकीनंतर कचरा संकलनाची नवी यंत्रणा

विधानसभा निवडणुकीनंतर कचरा संकलनाची नवी यंत्रणा

Next
ठळक मुद्देदोन कंपन्यांची नियुक्ती करणार : तीन कंपन्या टेक्निकल बीडमध्ये पात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कचरा संकलन योग्यप्रकारे व्हावे, यासाठी शहराचे झोनच्या आधारावर दोन विभागात विभाजन अर्थात दोन पॅकेजमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. टेक्निकल व आर्थिक बीडची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याबाबतचा प्रसताव लवकरच स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. समितीच्या मंजुरीनंतर सभागृहाची मंजुरी घेतली जाईल. विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कचरा संकलनाची नवी यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे.
सध्या कनक रिसोर्सेस कंपनीकडे शहरातील घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी आहे. प्रति टन १४३६ रुपये दराने महापालिका या कंपनीला बिल देते. कनकनेही कचरा संकलनासाठी पुन्हा निविदा भरली होती. परंतु नियम व शर्तीत अपात्र ठरविण्यात आले. कनक कंपनीची २९० वाहने व १५५० कर्मचारी शहरात कार्यरत आहेत. नवीन कंपनी आल्यास या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
शहराचे झोन क्रमाक १ ते ५ व झोन क्र्रमांक ६ ते १० असे दोन पॅकेजमध्ये विभाजन करण्यात आले आहे. दोन्ही पॅकेजसाठी कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. एका पॅकेजची जबाबदारी एका कंपनीकडे देण्याचा फॉर्म्युला अमलात आणला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. एकाच कंपनीला दोन पॅकेजचे काम करणे शक्य होणार नाही. नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कंपन्यांना ९० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत कंपन्यांना यंत्रणा उभारण्याला सुरुवात करावयाची आहे. कनककडे कार्यरत कर्मचाऱ्यांना फिटनेस व कार्यक्षमतेच्या आधारावर सामावून घेण्यासंदर्भात शिफारस केली आहे.
शहरातील कचरा संकलनासाठी पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. परंतु तांत्रिक बीडच्या आधारावर मे. ए.जी. एन्वायरो, ए टू झेड व बीव्हीजी कंपनीला टेक्निकल बीडमध्ये पात्र ठरविण्यात आले आहे. फायनान्शियल बीडमध्ये बीव्हीजीने एका पॅकेजमध्ये प्रति टन १६६५ रुपये तर पॅकेज दोनसाठी १८०० रुपये प्रति टन अशी तयारी दर्शविली आहे. दोन्ही पॅकेज कमी दराचे आहेत. परंतु या कंपनीला एकाच पॅके जचे काम दिले जाणार आहे. दुसऱ्या पॅकेजसाठी कमी दराच्या निविदेवर चर्चा केली जाणार आहे.
कनकचे बीड उघडलेच नाही
कनक रिसोर्सेस व मनपा प्रशासन यांच्यात अतिरिक्त बिल देण्याच्या मुद्यावरून प्रकरण न्यायालयात गेले होते. यात महापालिकेच्या बाजूने निर्णय आला. त्यामुळे महापालिका प्रशासन व पदाधिकारी पुन्हा कनकला काम देण्यास इच्छुक नव्हते. तसेच कनकला असलेल्या शर्ती व अटींची पूर्तता करता आलेली नाही. कनकने १६०० रुपये प्रति टन दराने काम करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र या कंपनीचे बीड उघडण्यात आले नसल्याची माहिती आहे.

Web Title: New system of garbage collection after assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.