नागपुरातील निमगडे हत्याकांड : सीबीआयकडून पाच लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 08:45 PM2019-07-29T20:45:26+5:302019-07-29T20:46:41+5:30

तीन वर्षांपूर्वी भल्या सकाळी वर्दळीच्या मार्गावर गोळ्या घालून ठार मारण्यात आलेल्या एकनाथ धर्माजी निमगडे यांच्या मारेकऱ्यांचा पत्ता सांगणाऱ्याला सीबीआयने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती सांगणाऱ्याचे नाव आणि ओळख गुप्त ठेवली जाईल, असेही सीबीआय, मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेने म्हटले आहे.

Nimgade Massacre: Five lakh reward from CBI | नागपुरातील निमगडे हत्याकांड : सीबीआयकडून पाच लाखांचे बक्षीस

नागपुरातील निमगडे हत्याकांड : सीबीआयकडून पाच लाखांचे बक्षीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षांपूर्वी भल्या सकाळी वर्दळीच्या मार्गावर गोळ्या घालून ठार मारण्यात आलेल्या एकनाथ धर्माजी निमगडे यांच्या मारेकऱ्यांचा पत्ता सांगणाऱ्याला सीबीआयने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती सांगणाऱ्याचे नाव आणि ओळख गुप्त ठेवली जाईल, असेही सीबीआय, मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेने म्हटले आहे.
सेंट्रल एव्हेन्यूत राहणाऱ्या आर्किटेक्ट निमगडे यांची ६ सप्टेंबर २०१६ ला सकाळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी लाल ईमली गल्लीत पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणाने शहरात प्रचंड खळबळ उडवली होती. कोट्यवधींच्या जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा अंदाज बांधून स्थानिक पोलिसांनी एका बिल्डरसह आणि प्रॉपर्टी डिलर तसेच दलालांसह अनेकांची चौकशी केली होती. मात्र प्रदीर्घ तपास करूनही पोलिसांना या हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळाले नाही. दरम्यान, मृत निमगडे यांच्या नातेवाईकांसह अनेकांकडून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी जोरदार मागणी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, वर्षभरात सीबीआयच्या पथकाने नागपुरात अनेकदा भेटी दिल्या. तपास अधिकारी तसेच या प्रकरणाशी संबंधितांना विचारपूस केली. अनेकांची चौकशीही केली. मात्र, सीबीआयला निमगडेंच्या मारेकऱ्यांपर्यंत घेऊन जाणारा धागादोरा गवसला नाही. त्यामुळे सीबीआयच्या मुंबई कार्यालयातून सोमवारी एक पत्रक जारी करण्यात आले. त्यात निमगडे यांच्या हत्याकांडाचा छडा लावण्यात मदत करणारी माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे नमूद आहे. कार्यालय, केंद्रीय अण्वेषण ब्युरो (सीबीआय), विशेष गुन्हे शाखा, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई (संपर्क क्रमांक : ०२२ २७५७६८२०/ २७५७६८०४) किंवा तपास अधिकाऱ्याच्या मोबाईलवर (९५९४१४०५५५) संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन यात करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव आणि ओळख गुप्त ठेवण्यात येईल, अशी हमीही सीबीआयने दिली आहे.

Web Title: Nimgade Massacre: Five lakh reward from CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.