लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात शनिवारी पुन्हा चार संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. याच अलगीकरणाच्या इमारतीत नऊ महिन्याच्या गर्भवतीसह तिच्या दोन वर्षाच्या मुलीला ठेवण्यात आले. कक्षात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे.दिल्लीहून आलेल्यांसोबतच मोमीनपुरा किंवा सतरंजीपुऱ्यातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना आमदार निवासासह वनामती, रविभवन, लोणारा व सिम्बॉयसिस येथील अलगीकरण कक्षात महापालिका आणून ठेवत आहे. १६ एप्रिल रोजी सतरंजीपुऱ्यातील कोरोनाबाधित मृताच्या घराशेजारील एकाच कुटुंबातील सहा तर दुसऱ्या घरातील एका युवकाला मनपाने आमदार निवासात आणून क्वारंटाईन केले. यात नऊ महिन्याची गर्भवती व तिची दोन वर्षाची मुलगीही होती. त्या गर्भवतीने ‘लोकमत’ला फोन करून सांगितले की, त्याच दिवशी डागा रुग्णालयात तपासणीचा दिवस होता. याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. परंतु त्यांनी ऐकून न घेता थेट आमदार निवासात आणून क्वारंटाईन केले. पतीला दुसऱ्या खोलीत तर मला, मुलीला व नणंदेला दुसऱ्या खोलीत ठेवले. इमारत क्र. दोन चौथ्या माळ्यावरील खोली क्र. ४३३ मध्ये ग्लोव्हज बेडवर इतरही पडले होते. खोलीची साफसफाई झाली नव्हती. याची माहिती येथील एका कर्मचाऱ्याला दिली, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्हीच सफाई केली.नववा महिना असल्याने अवघडल्यासारखे होत आहे. यातच आमदार निवासातून कुणीना कुणी पॉझिटिव्ह येत असल्याने भीतीचे वातावरण आहे. येथे सर्वांना क्वारंटाईन केले असले तरी पाण्यापासून ते चहा व जेवणासाठी खोलीबाहेर व्हरांड्यात यावेच लागते. अशावेळी लागण होण्याची शक्यता असते. ज्या दिवशी आमदार निवासात आणले त्याच दिवशी नमुने घेऊन गेले, परंतु अहवाल मिळाला नाही. गर्भवती महिला व त्यांच्या कुटुंबासाठी वेगळी व्यवस्था असायला हवी, असेही तिचे म्हणणे होते.
नागपूरच्या आमदार निवासात अलगीकरण कक्षात नऊ महिन्याची गर्भवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 8:33 PM
आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात शनिवारी पुन्हा चार संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. याच अलगीकरणाच्या इमारतीत नऊ महिन्याच्या गर्भवतीसह तिच्या दोन वर्षाच्या मुलीला ठेवण्यात आले. कक्षात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे.
ठळक मुद्देकक्षातील संशयित पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण