१५ दिवसात पूर्ण झाले नऊ टक्के काम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:51+5:302021-07-27T04:09:51+5:30

नागपूर : कामठी रोडवर एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत तयार होत असलेल्या डबलडेकर उड्डाणपुलाच्या कामाच्या टक्क्यात पुन्हा नवा आकडा ...

Nine percent work completed in 15 days () | १५ दिवसात पूर्ण झाले नऊ टक्के काम ()

१५ दिवसात पूर्ण झाले नऊ टक्के काम ()

Next

नागपूर : कामठी रोडवर एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत तयार होत असलेल्या डबलडेकर उड्डाणपुलाच्या कामाच्या टक्क्यात पुन्हा नवा आकडा जारी करण्यात आला आहे. डबलडेकर उड्डाणपुलाच्या व्हायाडक्टचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. याच कामाची स्थिती ५ जुलैला ८२ टक्के सांगण्यात आली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये हे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते.

उड्डाणपुलाच्या भागातील स्टेशनचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंनी अ‍ॅप्रॉन तयार झाले नाहीत. गुरुद्वाराजवळ आरयूबीच्या भागात चौपदरी स्ट्रक्चर पूर्ण झाले नाही. इंदोरा चौकाला उड्डाणपूल जोडण्यासाठी आतापर्यंत काम सुरू होऊ शकले नाही. पुलाचे काम अपूर्ण राहिल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अवजड वाहने मंगळवारी उड्डाणपुलावरून धावत आहेत. उल्लेखनीय म्हणजे ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर कामाला गती आली आहे. नोव्हेंबर २०१७ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाला २८ महिन्यात पूर्ण करायचे होते. परंतु डिझाईनच्या मंजुरीत पेच आणि कोरोनामुळे कामावर परिणाम झाल्यामुळे प्रकल्पाला उशीर झाला. आता हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. यामुळे या प्रकल्पाला २८ ऐवजी ५० महिने लागणार आहेत.

.................

Web Title: Nine percent work completed in 15 days ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.