सुमेध वाघमारे
नागपूर : ड्रायव्हिंग लायसन्स व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) लवकरच मिळेल, या परिवहन विभागाच्या आश्वासनावर तीन महिने उलटून गेली; परंतु अद्यापही लोकांच्या हाती ना लायसन्स पडले, ना आरसी. सध्या राज्यातील ५० प्रादेशिक परिवहन कार्यालयासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालये मिळून तब्बल एक लाख २३ हजार ६१५ वाहनधारक आजही लायसन्सच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘आरसी’ पुरविण्याचे काम हैदराबादमधील रोझमार्टा कंपनी तर वाहन परवाना प्रिंट करण्याचे काम हैदराबादची युनायटेड टेलिकॉम कंपनी करायची.
जुलैपासून कर्नाटक येथील ‘एमसीटी कार्ड ॲण्ड टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीकडून लायसन्स व आरसी प्रिंट होणार होते. सप्टेंबर उजाडला तरी प्रिंटिंग सुरू झाली नव्हती.
‘एमसीटी कार्ड ॲण्ड टेक्नाॅलाॅजी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीकडून नागपूर, मुंबई व पुणे येथील आरटीओ कार्यालयातून लायसन्स व आरसी प्रिंटिंगला सुरुवात झाली आहे. प्रत्येक कार्यालयातून रोज १५ हजार, त्यानुसार ४५ हजार लायसन्स प्रिंट होऊन ते पोस्ट कार्यालय आणि तेथून लोकांपर्यंत पोहोचविले जातात.
- संदेश चव्हाण, प्रमुख संगणक
विभाग, परिवहन विभाग