मास्क नाही तर माफी नाही, ५०० रुपये दंड द्यावाच लागेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:36 PM2020-09-14T22:36:13+5:302020-09-14T22:37:29+5:30
नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अजूनही नियमांचे पालन होत नाही मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड केला जात होता. त्यानंतरही दिवसेंदिवस मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अजूनही नियमांचे पालन होत नाही मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड केला जात होता. त्यानंतरही दिवसेंदिवस मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी जारी केले. त्यानुसार दंड आकारण्याची कारवाई मनपाच्या उपद्रव शोध व निर्मूलन पथकाने सुरू केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी कोरोना नियंत्रण उपाययोजनांसंदर्भात आयोजित बैठकीत मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी आदेश जारी केले.
उपद्रव शोध पथक व पोलिसांना अधिकार
महापालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खासगी, शैक्षणिक, विविध मंडळे, वैद्यकीय, रहिवासी व व्यावसायिक क्षेत्र, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे यासह अन्य ठिकाणी लागू राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथक, स्वच्छता निरीक्षक, झोनचे सहायक आयुक्त, स्वच्छता अधिकारी, पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आले आहेत.