लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर उड्डाणपुलावरील खडबडीत रस्त्यामुळे वाहन चालविताना चालक घाबरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, चालकांना घाबरण्याची गरज नाही. खडबडीत रस्ता हा वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच आवश्यक आहे. अशा रस्त्यावर धावणारी वाहने रस्त्याला पकडून असतात, त्यामुळे वाहन घसरण्याच्या घटना कमी होतात. यासंदर्भात लोकमतने शहरातील तज्ज्ञांशी चर्चा केली. यात तज्ज्ञांनी उड्डाणपुलामुळे होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवरही काही सल्ले दिले.खडबडीत रस्त्याच्या संदर्भात एमएसआरडीसीचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता जीवन निकोसे म्हणाले की, वाहनांची रस्त्यावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी असे रस्ते बनविले जातात. ते म्हणाले, आरबीआयजवळ होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवर माझ्याकडे परफेक्ट सोल्यूशन आहे. पण एनएचएआय, पीडब्ल्यूडी, महामेट्रो, मनपा, महावितरण व वाहतूक पोलीस यांनी साईटवर माझ्यासोबत संयुक्त भेट घ्यावी. एलआयसी चौक ते आरबीआयदरम्यान रस्त्यावरील फूटपाथ तोडल्यास रस्ता मोठा होईल. त्याचबरोबर सिग्नल व्यवस्था करून एलआयसी व आरबीआय चौकातील सिग्नलसोबत सिंक्रोनाईज्ड केल्या जावे. त्यासाठी महावितरणच्या उपकेंद्राच्या काही जागेची गरज पडू शकते. रस्ता अनेक वर्षे मजबूत राहतोवाहन घसरू नये म्हणून खडबडीत रस्ते बनविण्यात येतात. हे रस्ते अनेक वर्षे मजबूत राहतात. गरमीमध्येही या रस्त्यावर वाहनाची पकड चांगली राहते, असे मत व्हीएनआयटीचे ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विश्रुत लांडगे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, शहरात बनणारे उड्डाणपूल अथवा अन्य विकासकामांमध्ये सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्बन मास ट्रान्सपोर्ट अथॉरिटी बनविण्याची गरज आहे. त्यात मनपा, पीडब्ल्यूडी, एनएचएआय, महामेट्रो, महावितरण, एनएमआरडीएचे अधिकारी सहभागी असावेत. दर महिन्यात बैठक घेऊन अडचणी व समस्यांवर चर्चा होऊ शकते. त्यातून भविष्यात निर्माण होणाºया समस्या सोडविल्या जाऊ शकतात. आरबीआयजवळ उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर बोलताना म्हणाले की, कस्तुरचंद पार्कच्या तीनही बाजूला वन-वे करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या सोडविली जाऊ शकते. वन-वे मुळे वाहनचालकांना फेरा पडेल, मात्र अपघात आणि वाहतुकीचा खोळंबा टाळता येईल. डिझाईनमध्ये फॉल्ट आहेसदर उड्डाणपुलाच्या डिझाईनमध्ये पूर्णत: फॉल्ट आहे. उड्डाणपूल बनविण्यापूर्वी येणाºया समस्यांवर विचार करणे गरजेचे होते. आज वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे. कायमस्वरूपी पर्याय शोधण्याची गरज आहे. त्यासाठी पुलाच्या निर्माणापूर्वी वाहतुकीचा सर्व्हे करणे आवश्यक होते. मला वाटते संपूर्ण शहरात वाहतुकीचा सर्व्हे होणे आवश्यक आहे. कारण भविष्यात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. सदर उड्डाणपुलाची समस्या सोडविण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी व तज्ज्ञांनी संयुक्त बैठक घेऊन पुलाला भेट देणे आवश्यक आहे. अशोक मोखा, आर्किटेक्टवाहतुकीचे नियम पाळल्यास समस्या सुटेलआरबीआयकडून एलआयसी चौकाकडे सरळ न जाता उड्डाणपुलाच्या खालून जात, एलआयसी चौकातून वळण घेतल्यास वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. परंतु वाहन चालक उड्डाणपुलावर चढून यू-टर्न घेऊन एलआयसी चौकाकडे जात आहे. हे चुकीचे आहे, त्यामुळे अपघातही होऊ शकतो. तसेच महामेट्रोद्वारे जयस्तंभ चौक ते आर्मी गेटदरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यासाठी कस्तूरचंद पार्कचे तीन रस्ते वन-वे करणे प्रस्तावित आहे, त्यावर विचार करण्यात येत आहे.चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
सदर उड्डाणपुलावर घाबरण्याची गरज नाही : तज्ज्ञांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:25 AM
सदर उड्डाणपुलावरील खडबडीत रस्त्यामुळे वाहन चालविताना चालक घाबरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, चालकांना घाबरण्याची गरज नाही. खडबडीत रस्ता हा वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच आवश्यक आहे.
ठळक मुद्देखडबडीत रस्ता वाहनचालकांच्या सुरक्षेसाठीच