लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी महापालिके ने ६५ रुग्णवाहिकेचा ताफा उभा के ला आहे. यात बहुसंख्य स्कू ल व्हॅनला रुग्णवाहिके चे स्वरुप देण्यात आल्याने सोयी कमी आणि गैरसोयीच जास्त आहे. विशेष म्हणजे, या रुग्णवाहिकेत ना ऑक्सिजनची सोय आहे, ना परिचारिकेची. यातच तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. उपलब्ध झालीतरी रुग्णवाहिका चालक टाळटाळ करतात. यामुळे याचा फायदा कुणाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. करोना काळात खासगी रुग्णवाहिकांसाठी रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने ताब्यात घेऊन दर निश्चित करून ती वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार महापालिका प्रशासनाने या महिन्याच्या सुरुवातीला २० रुग्णवाहिका तर ९ सप्टेंबर रोजी पुन्हा २५ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. आता मनपाकडे एकूण ६५ रुग्णवाहिका आहेत. प्रत्येक झोनला चार रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु रुग्णवाहिकेला घेऊन रुग्णांच्या तक्रारी वाढत आहे. रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेवर ‘लोकमत’ने शहनिशा केल्यावर मंगळवारी झोन वगळता इतर सर्व झोनमधील रुग्णवाहिकाचालकांनी आपल्या समस्या मांडत येण्यास टाळाटाळ केली होती. एकीकडे तातडीने रुग्णवाहिका मिळत नाही तर दुसरीकडे रुग्णवाहिका केवळ नावापुरतीच असल्याचा तक्रारी समोर येत आहे. विशेषत: ज्या स्कूल व्हॅनला रुग्णवाहिकेत रुपांतरीत के ले त्यात अनेक गैरसोयी आहेत. अशा रुग्णवाहिकेत खाट योग्य पद्धतीने बसविण्यात आलेली नाही. बेल्ट नसल्याने रुग्ण खाली पडण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरलेल्या रुग्णांनाच तातडीने या रुग्णवाहिकेची गरज पडते, परंतु रुग्णवाहिके त ऑक्सिजन सिलिंडरची सोय नसल्याने व रुग्णाच्या मदतीला परिचारिका नसल्याने रुग्णवाहिकेचा विशेष फायदा होत नसल्याचे दिसून येते आहे. चालक मदतही करीत नाहीएका रुग्णाच्या नातेवाईकाने ‘लोकमत’ला सांगितले, धंतोली झोनमध्ये बरेच फोन केल्यावर आणि विनंती केल्यावर रुग्णाला मेयो इस्पितळात घेऊन जाण्यास रुग्णवाहिकेचा चालक तयार झाला. रुग्णवाहिका घरी पोहचायला २० मिनिटांचा वेळ लागला. वृद्ध महिला रुग्ण असल्याने तिला उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्यास चालकाने स्पष्ट नकार दिला. रुग्णवाहिकेतील खाट ओबडधोबड होती. रुग्ण पडू नये म्हणून पकडून ठेवावे लागले. रुग्णालयात पोहचल्यावर रुग्णवाहिका चालकाची पैसे मिळण्याची अपेक्षा होती.
ना ऑक्सिजन, ना नर्स : स्कूल व्हॅन झाल्या रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 11:31 PM
करोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी महापालिके ने ६५ रुग्णवाहिकेचा ताफा उभा के ला आहे. यात बहुसंख्य स्कू ल व्हॅनला रुग्णवाहिके चे स्वरुप देण्यात आल्याने सोयी कमी आणि गैरसोयीच जास्त आहे.
ठळक मुद्दे मनपाच्या रुग्णवाहिकेचा फायदा कु णाला